मुंबई : ग्रहांचा सेनापती मंगळ 27 जून रोजी राशी बदलणार आहे. या दिवशी मंगळ सकाळी 6.30 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. मंगळाचा हा राशी परिवर्तन देखील विशेष आहे कारण यामुळे 37 वर्षांनी मेष राशीत अंगारक योग होणार आहे. हा अंगारक योग अनेक प्रकारे त्रासदायक ठरू शकतो. या अशुभ योगाचा प्रभाव देशासह जगातील अनेक लोकांवर दिसून येईल.


कधीपर्यंत राहणार अंगकारक योग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 जून रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत राहू ग्रह आधीच आहे. मंगळ आणि राहूच्या संयोगाने 37 वर्षांनंतर मेष राशीमध्ये अंगारक योग तयार होईल, जो 10 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. याआधी मार्च 1985 मध्ये राहू आणि मंगळाच्या संयोगामुळे मेष राशीत अंगारक योग तयार झाला होता.


मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे आणि राहू हा अशुभ ग्रह आहे. हे दोन ग्रह मिळून खूप अशुभ परिणाम देतात. या दोन ग्रहांच्या संयोगाने तयार झालेला अंगारक योग धनहानी, वादविवाद, कलह, उधारी, खर्च आणि नैसर्गिक आपत्तीचं कारण बनू शकतो, असे ज्योतिषांचं म्हणणं आहे. 


या 8 राशींबाबत काळजी घ्या


मंगळाच्या राशी बदलामुळे तयार झालेला अंगारक योग 8 राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतो. हे मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना जास्तीत जास्त नुकसान करेल. तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायासाठी काळ कठीण जाईल. राग आणि विसंगत बोलणे तुमच्या त्रासात वाढ करेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)