Mars Transit in Gemini Effects Zodiac Signs in marathi : ग्रहांचं गोचर आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात करतात. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. काही राशींसाठी ग्रहाचं हे संक्रमण शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. आता लवकरच मंगळ गोचर होणार आहे.  त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. मंगळ 16 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत मिथुन राशीत होता. यावेळी मंगळ गोचर काही राशीच्या लोकांसाठी बंपर धनलाभ होणार आहे. 


कधी होणार मंगळ गोचर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळ राशीचे संक्रमण 13 मार्च म्हणजे सोमवारी पहाटे 5.47 वाजता मिथुन राशीत होणार आहे. 


'या' राशींना धनलाभ


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण धनलाभ घेऊन आला आहे. तुम्ही जोडीदारासोबत आर्थिकदृष्ट्या अनेक गुंतवणूक करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी मंगळ गोचर भाग्यशाली ठरणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.



मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांनी मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी. हा काळ त्यांसाठी चांगला आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. तुम्हाला जोडीदाराची प्रत्येक कामात आणि निर्णयात साथ मिळणार आहे. कोर्टात कुठलं प्रकरण असल्यास ते मार्गी लागेल. 


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांना मंगळ गोचरमुळे अचानक धनलाभ होणार आहे. जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. नोकदार वर्गासाठी हा काळ आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. पगार वाढ आणि नवीन जबाबदारी वाढणार आहे. 



तूळ (Libra)


या राशीच्या लोकांचं लव्हलाइफ जोरदार असणार आहे. प्रेमविवाहामध्ये अडथळा येणाऱ्यांचा जोडप्यांसाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. त्यांचा विवाहाचे योग आहेत. या काळात तुमच्या हातून धार्मिक कार्य होईल. तुम्ही कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग्य आहे. 


मकर (Capricorn)


मंगळ गोचर हा काळ तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुना आजारपासून तुम्ही मुक्त व्हाल. शूत्रवर तुम्ही या काळात मात करु शकणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. परदेशवारीचे योग आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)