Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रह करणार कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचं भाग्य नक्की उजळणार
Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला खूप महत्त्व दिलं जातं. यावेळी सर्व ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांची राशी बदलतात. एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी त्याला गोचर असं म्हटलं जातं. ज्यावेळी जेव्हा हे ग्रह राशीमध्ये प्रवेश करतात त्यावेळी काही ग्रहांची युती तयार होते. इतकंच नाही तर आणि विविध प्रकारचे योग देखील तयार होतात.
10 मे रोजी आता मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा 1 जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळ 82 दिवस या राशीत राहणार असून त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचं हे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वैदिकशास्त्रानुसार, 10 मे रोजी दुपारी 1:44 वाजता मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
कुंभ रास
या राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचरमुळे शुभ परिणाम दिसून येणार आहे. यावेळी तुम्ही करणारे छोटे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. तुमचे जर काही जुने शत्रू असतील तर पराभूत होऊ शकतात. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याने तुमचा फायदा होणार आहे. तुमच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
कन्या रास
मंगळाच्या गोचरचा या राशीच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव पडणार आहे. तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार नाही, उलट खर्च कमी होतील. तसंच आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होणार आहे. या काळामध्ये तुमच्या व्यवसायात वाढ आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात.
धनु रास
या राशीच्या व्यक्तींनाही मंगळ गोचर फलदायी ठेवणार आहे. कुटुंबातील लोकांची तुमच्याबाबत आपुलकी वाढणार आहे. या काळामध्ये तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे.
मीन रास
मंगळ ग्रहां हे परिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ राहणार आहे. या काळात तुमच्या घरी लग्न कार्य किंवा इतर काही शुभ कार्य होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी प्रगती होऊ शकते. तुम्हाला परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कोर्टात काही प्रकरणं प्रलंबित असतील तर त्यामध्ये विजय मिळू शकेल. नोकरीत चांगला आणि मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रह करणार कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचं भाग्य नक्की उजळणार