Mangal Rashi Parivartan October 2022: ग्रहांचा सेनापती म्हटला जाणारा मंगळ ग्रह (Mangal Grah) सर्वांना लाभदायक ठरणार आहे. जेव्हा जेव्हा तो त्याची रास बदलतो तेव्हा तो अनेक राशींच्या लोकांची झोळी आनंदाने भरतात. यावेळी दिवाळीपूर्वी मंगळाचे गोचर होत आहे. 16 ऑक्टोबरला तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे (Mangal Gochar October 2022) या दिवाळीत 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यांना अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी. 


कुटुंबात सुख-शांती नांदेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : मंगळाच्या संक्रमणामुळे Mangal Gochar October 2022) या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. व्यवसायात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. घराची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात. 


सिंह : या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नोकरी बदलू शकता. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. भाऊ-बहिणीच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. पालकांचे सहकार्य मिळेल. बौद्धिक कार्य संपत्ती आणू शकते. 


घरात अनेक नवीन गोष्टी घ्याल


तूळ: तुमच्या भौतिक सुखांचा विस्तार होईल. घरात अनेक नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येऊ शकतात. मनाला शांती लाभेल. अभ्यासाशी संबंधित कामात यश मिळेल. तुम्ही तुमचे स्वतःचे घर खरेदी करू शकता. नोकरीत तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. 


धनु: मंगळाच्या गोचरामुळे (Mangal Gochar October 2022) तुम्हाला नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम होऊ शकतात. जुना मित्र किंवा नातेवाईक घरी येऊ शकतात. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. 


जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते


कुंभ : या राशीच्या लोकांना जुनाट आजारापासून मुक्ती मिळू शकते. कोर्ट-कचेरी केसेस तुमच्या बाजूने होऊ शकतात. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. मित्रांसोबत बाहेर फिरण्याची योजना आखू शकता. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरु करण्याचीही शक्यता आहे.


 


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)