Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार `या` राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश
Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.
Mars Gochar 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. दरम्यान ऑगस्ट महिला हा ज्योतिष्य शास्त्राच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. या महिन्यात महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीतील मंगळाच्या गोचरचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडेल.
ज्योतिषशास्त्रात मंगळाला पृथ्वीचा पुत्र संबंधोलं जातं. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. 18 ऑगस्ट रोजी मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
मंगळाचा राशी बदल मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होणार आहे. यावेळी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होणार आहे. या काळात शैक्षणिक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या ऑफर्स येतील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि कौटुंबिक जीवनात प्रगती होईल. त्याचबरोबर कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता निर्माण होतेय.
मीन रास
मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून सातव्या भावात भ्रमण करणार आहे. या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता. तुम्हाला आकस्मिक धन प्राप्त होऊ शकते. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. पगारात चांगली वाढ होणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर शुभ ठरणार आहे. यावेळी तुम्ही गुप्त शत्रूंवर विजय मिळवू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडणार आहे. कौटुंबिक जीवनात प्रगती होईल. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )