Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठारविक वेळेनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रह वेळोवेळी राशी चिन्हांसह नक्षत्रही बदलतात. दरम्यान या बदलाचा जीवनावर परिणाम होताना दिसतो. येच्या 23 सप्टेंबर रोजी मंगळ चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया मंगळाच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम मिळणार आहे.


मेष रास (Aries Zodiac)


चित्रा नक्षत्रात मंगळाचा प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. यावेळी तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. शनिदेवाच्या कृपेने कोणत्याही कामात यश मिळेल.


सिंह रास (Leo Zodiac)


चित्रा नक्षत्रात मंगळाचा प्रवेश अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तसेच या काळात स्पर्धक विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं. कोर्टात सुरू असलेली प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात.


धनु रास (Dhanu Zodiac)


चित्रा नक्षत्रात मंगळाचा प्रवेश तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला काही योजनांमध्ये यश मिळू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी चांगल्या घडणार आहेत. जे व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी कोणत्याही व्यावसायिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो. तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )