Mangal Surya Gochar 2023 : जुलै महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर उदय किंवा अस्त स्थितीत येतात. अशामुळे ग्रह गोचरमुळे अनेक ग्रहांचा विशेष संयोग जुळून येतो. हा संयोगचा 12 राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. कारण या संयोगामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास एक वर्षानंतर 17 ऑगस्ट 2023 ला सिंह राशीमध्ये मंगळ आणि सूर्याची भेट होणार आहे. सूर्य हा यश, आत्मविश्वास, आरोग्याचा कारक आहे तर मंगळ शौर्य, पराक्रम, विवाह, भूमीचा कारक मानला जातो. अशात या दोन ग्रहांच्या मिलनाने तीन राशींना अपार धनलाभ मिळणार आहे. (mangal surya gochar 2023 August 17 mangal surya yuti 3 zodiac people give immense wealth)


मंगळ सूर्याचा मिलनामुळे 'या' राशीच्या लोकांना होणार फायदा 


मेष (Aries)


मंगळ आणि सूर्याचा मिलनाचा सर्वाधिक फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. कारण मंगळ हा मेष राशीच्या स्वामी आहे. तुम्हाला या मिलनामुळे मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. प्रेमसंबंधात मंगळ सूर्य संयोग नातं मजबूत करण्यासाठी उत्तम ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


कर्क (Cancer)


सूर्य मंगळ मिलन हा कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात अचानक धनलाभाचे योग आहेत. बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुठे पैसे अडकले असेल तर ते तुम्हाला परत मिळणार आहे. तुमच्या बोलण्यातून समोरच्याकडून काम काढून घेण्यास तुम्ही यशस्वी ठराल. हा काळ व्यापारी वर्गासाठी उत्तम ठरणार आहे. 
 


सिंह (Leo)


सूर्य मंगळ युती सर्वाधिक भाग्यशाली सिंह राशीसाठी होणार आहे. कारण एक तर सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आमि दुसरीकडे मंगळ सूर्य युती ही सिंह राशीत घडून येत आहे. त्यामुळे या राशीच्या आत्मविश्वासात अचानक वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन आणि इक्रीमेंट होण्याचे योग आहेत. व्यवसायात जबरदस्त फायदा होणार आहे. विवाह इच्छुकांचे लग्न ठरणार आहे. हा काळ नातेसंबंध घट्ट करण्यासाठी उत्तम ठरणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)