Margashirsha Guruvar Vrat 2024 : वर्षाला 12 महिने असतात मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करुन महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं. यंदा मार्गशीर्ष महिना कधी आहे. शिवाय यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत किती आणि काय विशेष आहे सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर...(margashirsha Month Start Date margashirsha guruwar 2024 puja vidhi shubh muhurta vaibhav lakshmi puja ghat sthapana )


मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे. यंदा कार्तिक अमावास्या 1 डिसेंबरला 2024 आहे. तर मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून 2024 सुरु होतोय. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे. 



यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती?


यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत. पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे 5 डिसेंबर 2024 ला असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रतदेखील असणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार, 19 डिसेंबरला तिसरं मार्गशीर्ष गुरुवार आणि 26 डिसेंबरला चौथ आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे. 26 डिसेंबर 2024 ला सफला एकादशीचं व्रत असणार आहे. 


अशी करा घटाची मांडणी


घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्य भागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे नक्की ठेवा. 


असं करा महालक्ष्मीचं व्रत 


मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घट बसवण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत. दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करुन हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो.


गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते. महिला दिवसभर उपवास करु संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं. यादिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी. त्याशिवाय महिलांना हळदी कुंक, फुल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)