Astro Tips For Marriage: नोकरी, घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही अनेकांचा लग्न जमत नाही. कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही. तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते. कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं. हिंदू धर्मानुसार कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात. अशात ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रात ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून भाकीत केलं जातं. गुरुवारी ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यास अडसर दूर होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारचं व्रत- लग्न जमण्यास अडचण येत असेल तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर देवगुरू बृहस्पतींचा उपवास करावा. तसेच भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांचा एकत्र असलेल्या फोटोचं पूजन करावं. सलग 9 ते 11 गुरुवार हे व्रत करावं. यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. 


आंघोळीच्या पाण्यात हळद टाकावी- लग्न लवकर व्हावं यासाठी हा ज्योतिषीय उपाय प्रभावी आहे. गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकावी. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे कुंडलीतील कमकुवत गुरुला बळ मिळतं. मात्र हा प्रयोग करताना साबण वापरू नका.


शिवाची उपासना करावी- गुरुवारी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपासना करावी. यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक करावी. शिवाची उपासना केल्याने लग्नातील अडसर लगेच दूर होतो, अशी मान्यता आहे.


बातमी वाचा- Vastu Tips: आरशामुळे खुलणार नशिबाचं दार! वास्तुशास्त्रातील उपाय जाणून घ्या


तुळशीला पाणी आणि कच्च दूध अर्पण करा- गुरुवारी जातकाने तुळशीला जल अर्पण करावं. तसेच कच्च दूध अर्पण केल्याने लग्नातील अडसर दूर होतो. त्याचबरोबर तुळशीजवळ तुपाचा सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने चांगले परिणाम मिळतात.


तुळशी माला धारण करा- विवाह जमल्यानंतरही वारंवार अडचणी येत असतील गुरुवारी 108 वेळा विष्णुंचा जाप करावा. त्यानंतर गळ्यात तुळसी माळ धारण करा. यामुळे चांगला जोडीदार मिळतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)