Rahu Ketu Transit 2023 : ज्योतिषशास्त्रातील मायावी केतूचं नाव घेतलं तरी जाचकाला घाम फुटतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. यातून आपल्या कुंडलीत कधी शुभ तर कधी अशुभ योग तयार होतात. काही ग्रह अगदी काही दिवसात रास बदलतात. तर काही ग्रह हे सर्वाधिक काळ घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सर्वात वेगाने तर शनि सर्वात संथ गतीने आपली रास बदलतो. आज मंगळ ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला असून 16 नोव्हेंबरपर्यंत तो या राशीत विराजमान राहणार आहे. तर केतु हा ग्रह गेल्या दीड वर्षांपासून तूळ राशीत आहे. केतु ग्रह येत्या 30 ऑक्टोबरला कन्या राशीत संक्रमण करणार आहे. (mars and ketu create Angarak Yog  these three zodic signs bank balance to raise money)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा स्थितीत तूळ राशीत मंगळ आणि केतुची युती होणार आहे. या भेटीतून अतिशय खतरनाक आणि अशुभ असा अंगारक योग तयार होतो आहे. हा योग 27 दिवस असणार आहे. पण मंगळ केतुच्या अशुभ योगातूनही काही राशींच्या लोकांना तो वरदान ठरणार आहे. कुठल्या आहेत या नशीबवान राशी जाणून घ्या. 


तूळ (Libra Zodiac)


 मंगळ आणि केतुच्या युतीमुळे या राशीला फायदा होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नावाजलेल्या लोकांशी तुमची ओळख होणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहे. तुमच्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. भौतिक सुखात वाढ होणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. मात्र या काळात तुमचा खर्च वाढणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac) 


या राशीच्या जातकांना मंगळ आणि केतुची युती भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. अकडलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. ही युती खासकरुन मीडिया, शिक्षण आणि मार्केटिंग क्षेत्रात लोकांना जास्त फायदेशीर ठरणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


मंगळ आणि केतुची युती या राशीसाठी नशीब पालटणारी ठरणार आहे. तुम्हाला नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. परदेशात जाण्याचा योग आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)