Mangal Budh Yuti : तूळ राशी होणार मंगळ-बुधाची युती; `या` राशींवर होणार पैशांची बरसात
Mars-Budh Conjunction: बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Mars-Budh Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान ग्रहांच्या बदलावेळी इतर ग्रहांशी युती करतात. दरम्यान या युतीचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे.
बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
मेष रास (Aries Zodiac)
मंगळ आणि बुध यांचे संयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला यावेळी काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक निर्णयाचं स्वागत होईल.
मिथुन रास (Mithun Zodiac)
मंगळ आणि बुध यांचा संयोग या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला अपघाती पैसे देखील मिळू शकतात. ही युती तुमच्या राशीतून पाचव्या घरात होणार आहे. या काळात मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. ज्योतिष आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे कमवू शकता.
धनु रास (Dhanu Zodiac)
तूळ राशीमध्ये मंगळ आणि बुध ग्रहाची जोडी धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. अविवाहित आहेत त्यांना या काळात जीवनसाथी मिळू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. या काळात मुलाची प्रगती होऊ शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )