Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, `या` राशी होणार मालामाल
Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे.
Diwali 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या राशीबदलामुळे अनेकदा विविध राजयोग तयार होतात. असंच आज दिवाळीच्या दिवाशी शनी देवांनी शश राजयोग तयार केला आहे. मात्र या राजयोगासोबत काही मंगळ आणि सूर्याची युती देखील होतेय.
आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. तर काहींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ होणार आहे.
मेष रास
सूर्य-मंगळ युती आणि शश राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना संपत्तीची कमतरता भासणार नाही. याचसोबत तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तज्ञांच्या सल्ल्याने शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती आणि प्रभाव वाढू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
मिथुन रास
शश राजयोग आणि मंगळ-सूर्य युतीमुळे नशीब तुमच्या सोबत असणार आहे. यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळतील. भौतिक सुखात वाढ होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची ओळख आणि प्रशंसा होणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.
मकर रास
शश राजयोग आणि मंगळ-सूर्य युतीमुळे तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. तुम्ही नोकरी करत असाल तर वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते
जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)