Mars Transits 2023 : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा ग्रह गोचरमुळे अतिशय महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बँक टू बँक तीन ग्रहांनी आपली स्थिती बदली आहे. त्यात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहानेही शुक्राच्या राशीत प्रवेश केला आहे. शुक्राची रास म्हणजे तूळ राशीत 3 ऑक्टोबरला गोचर केलं आहे. आता मंगळदेव या राशीत 16 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे मंगळदेवामुळे दिवाळी बंपर धमाका असणार आहे. काही राशींच्या बँक बॅलेन्स वाढणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Mars Transits 2023 or Mangal Gochar 2023 Diwali will be rich for these zodiac signs till 16 november )


सिंह (Leo Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळदेव सिंह राशीच्या तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला जोरदार फायदा होणार आहे. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना मोठ्या नफा लाभणार आहे. करिअरमध्ये आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. मंगळदेवामुळे तुम्हाला परदेश वारीचे योग आहेत. या काळत तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुम्ही दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर मालमत्ता किंवा वाहन खरेदीची योग आहेत. 


तूळ (Libra Zodiac)


मंगळ गोचरमुळे सर्वाधिक फायदा हा तूळ राशीच्या लोकांना होणार आहे. मंगळ देव तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यात तूळ राशी ही शुक्राची रास असल्याने या लोकांना तुम्हाला धनलाभ होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. सैन्य, पोलीस आणि क्रीडा क्षेत्राशी संंबंधिक लोकांना मंगळदेवाची साथ मिळणार आहे. तुमचा मान सन्मान या काळात द्विगुणीत होणार आहे. जोडीदारासोबतचं नातं मजबूत होणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac)


मंगळदेव धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्क परिणाम घेऊन आला आहे. मंगळदेव तुमच्या कुंडलीत धन स्थानी आहे. त्यामुळे तुम्हाला अमाप धनलाभ होणार आहे. करिअरमध्येही नवीन संधी उपलबद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. व्यवसायिकांसाठी मंगळदेव नफा घेऊन आला आहे. 


हेसुद्धा वाचा - Kalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)