Chandra Shukra Yuti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळानंतर आपली रास बदलत असतात. शनिदेव सर्वात संथ गतीने तर चंद्रदेव सर्वात वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. शनी ग्रह अडीच वर्ष एका राशीत राहतो तर चंद्र हा अडीच दिवस एका राशीत असतो. चंद्रदेव (Chandra gochar 2023) 10 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्रदेव (shukra gochar 2023) आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत शुक्र आणि चंद्र यांचं मिलन होतं आहे. यातून कलात्मक योग निर्माण होतो आहे. (Moon Venus Conjunction shukra chandra yuti create Kalatmak Yog 2023 these five zodiac signs bank balance to raise money)
त्याशिवाय हिंदू पंचांगानुसार शुभ योग, साध्य योग आणि मघा नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा दिवस आणि पुढील अडीच दिवस काही राशींसाठी वरदान असणार आहे. कुठल्या राशींवर शुकदेव आणि चंद्रदेव प्रसन्न होणार आहेत, पाहूयात.
या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. सामाजिक कार्यातून तुम्हाला मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा योग प्रगती घेऊन आला आहे.
या राशीच्या लोकांसाठी या योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय फलदायी ठरणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. नवीन वस्तू खरेदीचा योग आहे. परदेशवारीचे स्वप्नही पूर्ण होणार आहे.
या राशीसाठी हा योग फलदायी ठरणार आहे. तुमची धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. उत्पन्नात वाढ होणार असून व्यवसायची व्यापती वाढवणार आहात. सामाजिक कार्यात मन रमणार आहे. घरात तुमच्या मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. पुढीच अडीच दिवसात तुम्हाला अनेक मार्गाने शुभवार्ता मिळणार आहे. आर्थिक लाभामुळे बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. प्रेम जीवनासाठी हा योग शुभ ठरणार आहे.
या लोकांसाठी पुढील अडीच दिवस सकारात्मक असणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. पैसे वाचवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. घरात पाहुण्याचं आगमन तुमच्यासाठी आनंदायी असणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. व्यवसायिकांसाठी हा योग प्रगती घेऊन आला आहे. शत्रूदेखील तुमचं कौतुक करणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.