Mangal Planet Transit: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र ठराविक वेळेच्या अंतराने गोचर करतात. ग्रहांचे हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी हानिकारक ठरू शकतं. ग्रहांचा सेनापती मंगळ ऑगस्टमध्ये मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या राशींना धन आणि संपत्ती मिळू शकणार आहे. याशिवाय काही राशींना आनंद मिळणार आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.


मकर रास (Makar Zodiac)


मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आता करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीसाठी चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. 


सिंह रास (Leo Zodiac)


मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून नवव्या घरात होणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तुमची बुद्धिमत्ता विकसित होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होईल. 


कर्क राशि (Cancer Zodiac)


मंगळाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कमविण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील आणि तुम्ही पैसेही वाचवू शकाल. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रवेश होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )