Mangal Gochar: 5 फ्रेबुवारीपर्यंत धनु राशीत राहणार मंगळ; `या` राशींना मिळणार अमाप पैसा, प्रतिष्ठा
Mangal Transit In Dhanu: ग्रहांचा सेनापती मंगळ 28 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश केला आहे. मंगळ या राशीमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. या काळात मंगळ ग्रह काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Mangal Transit In Dhanu: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांतच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या स्थितीला गोचर म्हटलं जातं. ग्रहांच्या या गोचरचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम दिसून येतो. डिसेंबर महिन्यात मंगळ ग्रहाने गोचर केलं आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
ग्रहांचा सेनापती मंगळ 28 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश केला आहे. मंगळ या राशीमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. या काळात मंगळ ग्रह काही राशींचं भाग्य उजळणार आहे. जाणून घेऊया मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
धनु रास (Dhanu Zodiac)
मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणर आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. परदेशातूनही नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. या काळात विवाहित लोकांमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ असणार आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नक्कीच प्रगती होईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
कन्या रास (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन अनुकूल ठरू शकते. मालमत्ता खरेदीचीही शक्यता आहे. या काळात तुमचे करिअर खूप चांगले होणार आहे. परदेशी डीलच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकणार आहे. तुम्ही रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, मेडिकलशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
मंगळाचं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना यावेळी बढती मिळू शकते. बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. पैसे गुंतवल्यास फायदा होईल. व्यवसायात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )