मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे बुध ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम मानवी जीवनासह सर्व राशींवर दिसून येतो. बुध ग्रह 26 ऑक्टोबर रोजी तूळ राशीमध्ये प्रवेश केला आहे. ही स्थिती 13 नोव्हेंबरपर्यंत अशीच राहणार आहे. त्यामुळे या संक्रमणाचा प्रभाव विशेषत: 3 राशींवर दिसून येणार आहे. या राशींच्या संबंधित लोकांना यावेळी चांगला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशींसाठी ठरणार लाभदायक


कन्या 


या राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. इतकंच नाही तर या राशीच्या व्यक्तींना कामात्या क्षेत्रात अनुकूल संधी मिळू शकते. परिणामी उत्पन्नंही वाढू शकतं. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका होऊ शकते.


कर्क


ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात प्रवेश केलाय. यामुळे करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. इतकंच नाही तर पैशांशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्यापासून मुक्त होऊ शकता. याशिवाय समाजात तुमची लोकप्रियता वाढू शकते.


मिथुन


बुधचे संक्रमण होताच या राशीच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. यावेळी लोकांना व्यवसायात चांगले पैसे मिळू शकणार आहेत. तसंच कर्जामध्ये अडकलेला पैसा मिळणार आहे आणि दीर्घकाळापासून कर्जही वसूल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मुलं परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)