Conjunction Of Mercury And Jupiter: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीनंतर इतर ग्रहांशी संयोग तयार करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. सध्या गुरू मेष राशीत आहे आणि मार्चच्‍या सुरूवातीला बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांच्या या चालीमुळे मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. मात्र या काळात 3 राशी अशा आहेत ज्यावर गुरु आणि बुध ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळू शकणार आहे. 


धनु रास (Dhanu Zodiac)


बुध आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. भागीदारीत केलेले व्यवसायही यशस्वी होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रभाव आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल.


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचा संयोग शुभ ठरू शकतो. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहे. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता, जे शुभ राहणार आहे. तुम्ही कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कोणताही नवीन व्यवसाय करार करता आला तर भविष्यात ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.  या काळात तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल.


कर्क रास (Cancer Zodiac)


बुध आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. व्यावसायिक असाल तर या काळात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय निर्माण होईल.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)