Gangajal Vastu Tips: हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व आहे. धार्मिक  पिढ्यांपिढ्या गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. गंगा नदीत स्नान केल्यानं व्यक्ती पवित्र होते अशी मान्यता आहे. गंगाजल शुभ अशुभ कार्यात कार्यात वापरलं जातं. अशुभ कार्यात शुद्धिकरणासाठी गंगाजल शिंपडलं जातं. गंगाजल शिवलिंगावर अर्पित केल्याने अनेक संकटातून सुटका होते. गंगाजलाचे काही थेंब पाण्यात टाकून शिवलिंगावर अर्पित केल्याने शंकर प्रसन्न होतात. त्यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होतात, असं सांगितलं जातं. कारण भगवान शंकरानी आपल्या जटांमधून गंगेचा उगम होतो. गंगाजलाचा उपयोग चरणामृत बनवण्यासाठी उपयोग केला जातो. गंगाजलाशिवाय चरणामृत अपूर्ण मानलं जातं. मंदिरातही पूजा आरतीनंतर श्रद्धाळूंना प्रसाद म्हणून गंगाजल दिलं जातं. गंगाजलमध्य ई कोलाई बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असल्याचं लखनौच्या नॅशनल बॉटनिकल रिसर्ज इंस्टिट्युटनं सांगितलं आहे. 


गंगाजलाचे उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगाजल धार्मिक कार्यात शुद्धिकरणासाठी उपयोग केला जातो. तर अशुभ कार्यानंतर शुद्धिकरणासाठी गंगाजल शिंपडलं जातं. अशुभ कार्यातही गंगाजल आपलं पावित्र्य सोडत नाही. त्याचबरोबर अशुद्ध वस्तूंच्या संपर्कात आल्यास त्या वस्तूही शुद्ध होतात. व्यक्तिच्या मृत्यूवेळीही गंगाजल दिलं जातं. गंगाजल प्यायल्याने पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. गंगाजलाच्या शिंपडल्यानंतर घर आणि शरीराची शुद्धी होते. तसेच नकारात्मक शक्तिंपासून संरक्षण मिळतं. धार्मिक मान्यतेनुसार गंगा नदी मोक्षदायिनी आहे. त्यामुळे शुभ योगावर लोकं गंगा नदीत स्नान करतात. 


बातमी वाचा- Shani Surya Yuti: कुंभ राशीत पिता-पुत्र एकत्र येणार! 3 राशींसाठी प्रतिकूल काळ


गंगाजलचे फायदे


  • गंगाजल प्यायल्याने शरीर निरोगी राहतं आणि व्यक्तींची आर्युमर्यादा वाढते.

  • गंगाजल घरात ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा वास होतो. तसे सुख समृद्धी वाढते.

  • रात्री बिछान्यावर गंगाजल शिंपडल्यास भीतीदायक स्वप्न पडत नाहीत.

  • घरात भांडणं होत असल्यास गंगाजल शिंपडल्यास परिणाम दिसून येते. नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण राहतं.

  • सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी गंगाजल वापरल्यास भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात.

  • शनिवारी एका तांब्यात पाणी भरून त्यात दोन चार थेंब गंगाजल टाका. त्यानंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. यामुळे शनिचा प्रभाव कमी होतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)