Shani Surya Gochar 2023 and its Effects: ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव पिता-पुत्र आहेत. मात्र या दोघांमधलं नातं तितकं जिव्हाळ्याचं नाही. त्यामुळे कुंडलीतील एखाद्या स्थानात शनि-सूर्य ही युती असल्यास विपरीत फळ मिळतं. नववर्षात सर्वच ग्रह गोचर करणार आहेत. 17 जानेवारीला न्यायदेवता शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत शनिदेव अडीच वर्षे ठाण मांडून बसणार आहेत. तर सूर्यदेव 13 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्यदेव 1 महिना असणार आहेत. म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत कुंभ राशीत शनि-सूर्य ही युती असणार आहे. त्यामुळे तीन राशींना सांभाळून राहावं लागणार आहे. हा काळ तीन राशींसाठी अनुकूल नसेल. चला पाहूयात या तीन राशी कोणत्या आहेत.
कुंभ- शनि-सूर्याची युती कुंभ राशीत होणार आहे. दोन्ही ग्रहांचा जातकांवर प्रभाव पडतो. त्यामुळे कुंभ राशीला साडेसाती सुरु असताना या युतीचा विपरीत परिणाम जाणवेल. हा काळ तणावाचा असणार आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत संबंध तणावपूर्ण असतील. त्यामुळे वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या काळात गुंतवणूक करणं टाळा. नवा व्यवसाय सुरु करायचा असल्यास जरा थांबा आणि महिनाभरानंतर विचार करा.
वृश्चिक- 17 जानेवारीपासून वृश्चिक राशीला शनिची अडीचकी सुरु होणार आहे. त्यात 13 फेब्रुवारीला सूर्यासोबत युती होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीतील सूर्य आणि शनिची युती जातकांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या काळात सांभाळून राहणं आवश्यक आहे. एक छोट्याशा चुकीमुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आरोग्याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे सल्ला घेऊनच काम करा.
बातमी वाचा- Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ
कर्क- कर्क राशीला देखील 17 जानेवारीपासून अडीचकी सुरु होणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीसारखेच परिणाम जातकांना भोगावे लागतील. या काळात गाडी चालवताना काळजी घ्या. तसेच लांबचा प्रवास करणं टाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडतील. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात मोठी गुंतवणूक शक्यतो करू नका. तसेच आपलं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्याल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)