Mohini Ekadashi 2024 Date : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे मोक्ष प्राप्त मिळते शिवाय अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 18 मे रोजी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सुरु होणार असून ती 19 मे रोजी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम आहे की, एकादशीचं व्रत हे 18 की 19 कुठल्या दिवशी पाळावं. 


मोहिनी एकादशी कधी आहे? (Mohini Ekdashi 2024 Shubh Muhurat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवार 18 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांपासून रविवार 19 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजून 50  मिनिटांपर्यंत आहे. उदय तिथीनुसार रविवार 19 मे  ला मोहिनी एकादशीचं व्रत करायचं आहे. तर एकादशीचे पारण 20 मे रोजी पहाटे 5.28 ते 8.12 पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. (Mohini Ekadashi on May 18 or 19 mohini ekadashi Date know shubh muhurat pujan vidhi in marathi )


मोहिनी एकादशी शुभ योग (Mohini Ekdashi Shubh Yog) 


मोहिनी एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग असणार आहे. 


मोहिनी एकादशी पूजन विधी


मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचं संकल्पना करा. त्यानंतर मंदिर आणि पूजा स्थळ स्वच्छ करा. पूजा स्थळी चौरंग किंवा पाट घ्या. त्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र घाला. यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा. त्यांना चंदन लावा. भगवान विष्णूला पिवळं फुलं प्रिय असल्याने ते अर्पण करा. त्यानंतर धूप, दिवा आणि नैवेद्य दाखवा. मोहिनी एकादशीची कथा अवश्य वाचा. कारण त्याशिवाय व्रत आणि पूजा अपूर्ण मानली जाते. या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जातं. संध्याकाळी आरती करून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)