मुंबई : सगळ्याच लोकांच्या अंगावरती तिळ असतोच. या तिळाकडे आपण फारसं लक्ष देत नसलो, तरी या तिळाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. तिळ येणं यामागे विज्ञान असलं तरी, ज्योतिषशास्त्रात याला मोठं महत्व आहे. आपल्या शरीरावरील काही तीळ जन्मासोबत येतात, तर काही काळाबरोबर तयार होतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरावरी तिळांचा अर्थ सांगणार आहोत. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावर असणाऱ्या तिळांचं काय महत्व आहे आणि ज्योतिषशास्त्र याबद्दल काय सांगते हे जाणून घ्या.


कानावर तीळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या कानावर तीळ असणे खूप भाग्यवान मानले जाते. अशा महिला स्टेट फॉरवर्ड असल्याचे बोलले जाते. तिला कोणत्याही बाबतीत झटपट निर्णय घेणे आवडते, इतकेच नाही तर अशा महिला हुशार असतात आणि त्यांच्याकडे पैशांची कमतरता नसतो.


या महिलांनी त्यांचे आवडते काम किंवा इतर कोणतेही काम करावे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. मग ती नोकरी असो वा त्यांचा व्यवसाय. कानावर तीळ असलेल्या महिला प्रत्येक कामात यशस्वी होतात.


गालावर तीळ


ज्या महिलांच्या गालावर तीळ असते, ते कोणत्याही व्यक्तीला सहज आकर्षित करतात. तसेच तिचा हा तीळ सौंदर्याचे प्रतिक मानला जातो. अशा महिलांचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिला इतरांबद्दल बोलणे अधिक आवडते. इतकंच नाही तर ज्या महिलांच्या उजव्या गालावर तीळ असतो, अशा महिला मेहनती आणि हृदयाने स्वच्छ मानल्या जातात. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते.


ओठांवर तीळ


ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असते ते सहजपणे कोणालाही वेड लावतात. प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होतो. अशा महिला पुरुषांनाही खूप आवडतात. कारण ओठांभोवती किंवा ओठांच्या वरती तीळ महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. असे म्हणतात की ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या बाजूला उजव्या बाजूला तीळ असतो, त्या लाइफ पार्टनरच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात.


ज्या महिलांच्या ओठाखाली तीळ असतात, त्या खूप मेहनती असतात आणि त्यांना त्यांच्या कामात यश मिळते.


खांद्यावर तीळ


ज्या महिलांच्या खांद्यावर तीळ असतो, त्यांना समाजात आणि आजूबाजूच्या लोकांकडून खूप मानसन्मान मिळतो. ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो त्या खूप शांत आणि सहनशील असतात. तिला आयुष्यात हळू हळू पुढे जाऊन स्वतःची जागा बनवायला आवडते.


या स्त्रिया खूप हुशार असतात आणि यामुळेच त्या आपला जीवनसाथी अतिशय काळजीपूर्वक निवडतात.


नाकावर तीळ


अनेकांच्या नाकावर तीळ असतो, परंतु जर एखाद्या स्त्रीच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असेल, तर ती खूप सुंदर आणि भाग्यवान असते. जर स्त्रीच्या नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असेल, तर तिला मातेकडून पूर्ण पाठिंबा मिळतो. ज्या लोकांच्या नाकाच्या पुढच्या बाजूला म्हणजे नाकाच्यावर तिळ असतो, ते प्रत्येक कामात खूप हुशार असतात.


छातीवर तीळ


ज्या महिलांच्या छातीवर तीळ असते, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता असते. ते मोठ्या प्रमाणात भाग्यवान मानले जातात आणि त्या खूप रोमॅन्टीक असतात.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)