Money Mantra in Astrology : पैशाशिवाय जगणं कठीण आहे. अनेकांना मेहनत करुनही हवे तसे पैसे मिळतं नाही. तर कोणाकडे पैसा येतो पण तो टिकत नाही. तर कोणाचे पैसे कुठूना कुठे अडकले असतात. अशावेळी माणूस निराश होतो. पण आता निराश व्हायची गरज नाही. कारण ज्योतिषशास्त्रात असे काही मंत्र सांगण्यात आले आहे. ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये काम पैशांचा पाऊस पडेल. शास्त्रानुसार या 10 धार्मिक मंत्रांचा नियमित जप (Attract Money) केला तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या चमत्कारी मंत्रांबद्दल. (Money Mantra in Astrology Tips and These 10 Mantras Will Make You Rich marathi news)


कुबेर मंत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला कायम पैशाची कमतरता जाणवत असेल तर दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करा. 


'ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवाणाय, धन धन्याधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा॥' 



लक्ष्मी मातेचा मंत्र


जीवनात सुख समृद्धी राहावी म्हणून माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा रोज जप करावा. 


ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:। 


आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मंत्र


माता लक्ष्मीच्या या मंत्राचा नियमित जप केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते.


ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।



भगवान धन्वंतरीचा मंत्र


हा भगवान धन्वंतरीचा विष्णूच्या रूपातील पारंपारिक पौराणिक मंत्र आहे. याचा नियमित जप केल्याने आर्थिक लाभ होतो. 


ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:


अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय


त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप


श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥



गणेश मंत्र


गणेश मंत्राचा रोज नियमित 108 वेळा जप केल्याने तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहते. 


ओम गं गणपतये नमः



भगवान विष्णूचा मंत्र


देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूच्या या मंत्रांचा नियमित जप करा. 


ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि। ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्।



कुंडलीत संपत्ती मजबूत करण्याचा मंत्र


या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील पैशाची समस्या दूर होते.  कुंडलीतील धनाची स्थिती मजबूत होते. 


देवानां च ऋषिणां च गुरुं काञ्चनसन्निभम्। बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।। ओम ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः।


हनुमान मंत्र


या मंत्राचा रोज जप केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक क्षेत्रात लाभ होतो.


'ॐ हनुमते नम:' 


भगवान शिव मंत्र


या मंत्रापेक्षा सोपे दुसरे काहीही नाही. तुम्हाला कोणतीही समस्या असली तरी या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करा.  


ॐ नम: शिवाय 


पैशाची कमतरता दूर करण्यासाठी मंत्र


पैशाची कमतरता दूर करण्यासाठी खालील दिलेले दोन मंत्रांचा दररोज जप करा. 


'धनाय नमो नम:' आणि ' ऊं धनाय नम:'



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)