Monthly Horoscope December 2024 in Marathi : या वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर हा आपल्यासाठी कसा असणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकित केलंय. ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीनुसार मानवी जीवनावरील परिणाम सांगण्यात आलंय. डिसेंबरचा महिना हा  मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. काही राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती पाहिला मिळणार आहे. तर काही लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एकंदीत आरोग्यापासून करिअरपर्यंत डिसेंबर महिना हा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल याबद्दल जाणून घेऊयात. 


मेष (Aries Zodiac)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा असणार आहे. त्यांना प्रगतीसाठी अनेक संधी मिळणार आहेत. त्यांचे अनेक महिन्यांपासून रखडलेली कामं डिसेंबर महिन्यात मार्गी लागणार आहे. त्यांना या महिन्यात आर्थिक पाठबळ मिळणार आहे. व्यवसायत नवीन प्रयोग केल्यास त्यात यश लाभणार आहे. या महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळणार आहे. तुम्हाला कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागणार आहे. कुटुंबात शुभ कार्य होणार आहे. एकंदीत हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. प्रॉपर्टीच्या कामात मोठी गुंतवणूक करण्यासाठीहा महिना शुभ असणार आहे. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला सिद्ध होणार आहे. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यात महागात पडू शकतं. 


वृषभ (Taurus Zodiac) 


वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना चांगला असणार आहे. मात्र हा महिना कुटुंबाच्या दृष्टीकोनातून चांगला नसणार आहे. कुटुंबात परस्पर मतभेद होणार आहे. तर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा महिना चांगला असणार आहे. धार्मिक प्रवासाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी विरोधक पराभूत करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. या महिन्यात नोकरदार लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असणार आहे. अन्यथा तुम्ही काही वादात अडकण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत घ्यावी लागणार आहे. या महिन्यात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या येणार आहेत. मुलांच्या शिक्षणाबाबत मानसिक चिंता असणार आहे. या महिन्यात तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटणार आहात. 


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना सामान्यत: चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ उतारांचा असणार आहे. अगदी तुमच्यावर वैयक्तिक कर्ज घेण्याची वेळ ओढवणार आहे. आर्थिक अडचण असताना घरात शुभ कार्याचे नियोजन होणार आहे. त्यात घरात वारंवार पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या महिन्यात तुमची जास्त धावपळ होणार असल्याने आरोग्यावर परिणाम होणार आहे. हवामानाचा परिणाम कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. या महिन्यात वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. कोणाला कुठलंही वचन किंवा शब्द देऊ नका. तर वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना चांगला सिद्ध होणार आहे. घरात शुभ कार्य होणार आहे. या महिन्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असणार आहे. व्यवसायात मोठे बदल होणार असून तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे. या महिन्यात तुम्ही मोठ्या भागीदारीचा भाग बनणार आहात. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती मिळणार आहे. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर आणि वागण्याने खुश दिसतील. या महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळणार आहे. तसंच, तुम्ही या महिन्यात धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करणार आहात. हा महिना तुमच्यासाठी चांगल्या बातम्यांनी भरलेला असणार आहे. कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


डिसेंबर महिना तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. प्रलंबित कामात यश मिळणार आहे. या महिन्यात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही काही नवीन कामाची रूपरेषा तयार करण्यात यशस्वी होणार आहात. ज्याचा भविष्यात फायदा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या भागीदारांशी सावध राहण्याची गरज असणार आहे. अन्यथा तुमच्या योजनांना फटका बसू शकतो. या महिन्यात वादांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. मालमत्तेशी संबंधित वादात अडकू नका. या महिन्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. सावधगिरी बाळगणे हे या महिन्यातील ध्येय ठेवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला असणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


या वर्षातील शेवटचा महिना हा तुमच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल घडविणारा ठरणार आहे. एखादा मोठा निर्णय तुम्ही घेणार असून त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होणार आहे. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. मात्र, या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ-उतारांचा असणार आहे. तुम्हाला एखाद्याकडून मोठी आर्थिक मदत घ्यावी लागणार आहे. ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली येणार आहात. या महिन्यात तुमचे शब्द विचारपूर्वक वापरा, अन्यथा तुम्ही वादात अडकण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा महिना चांगला राहणार आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रात विरोधक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी करा. या महिन्यात कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची भीती आहे. 


तूळ (Libra Zodiac)  


तूळ राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण हा महिना तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. तसंच आर्थिकदृष्ट्यादेखील हा महिना कठीण असणार आहे. हॉस्पिटलच्या फेऱ्या आणि त्यात पैसे जाणार आहेत. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात व्यवसायात स्थिती सामान्य राहणार आहे. तुम्हाला काही मानसिक चिंतेनेही घेरले असणार आहात. या महिन्यात मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला मित्राकडून उत्तम सहकार्य लाभणार आहे. तसंच या महिन्यात तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत असणार आहात. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


डिसेंबर महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतील. मात्र ऋतुमानानुसार आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला सिद्ध होणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. अधिकारी तुमच्या मताशी सहमत असणार आहेत. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही काही नवीन काम सुरू करणार आहात. तुम्ही भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचे नियोजनही या महिन्यात करणार आहात. ज्यामुळे तुम्हाला नफा मिळणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या सहलीवर जाण्याचा विचार करणार आहात. तसंच तुम्हाला कुटुंबात काही चांगली बातमी मिळणार आहे. या महिन्यात पत्नी आणि मुलांशी सुरू असलेले मतभेद मिटतील. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र दिसणार आहात. तसेच या महिन्यात एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुमचे कोणतेही जुने प्रलंबित काम पूर्ण होणार आहे.


धनु (Sagittarius Zodiac) 


डिसेंबर महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. कुटुंबात शुभ कार्य असणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक गुरूला भेटणार आहात. जो तुम्हाला भविष्यासाठी उत्तम सूचना देतो. हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. प्रलंबित पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, त्यात यश मिळणार आहे. या महिन्यात जमीन किंवा वाहन खरेदीची करण्याचे योग आहेत. तुम्ही मोठी गुंतवणूकही करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांना या महिन्यात प्रमोशन मिळणार आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या वाणीच्या प्रभावाने लोकांना तुमचे अनुयायी बनवू शकता. तुमचा कोणताही जुना वाद संपुष्टात येणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)   


डिसेंबर महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता. कौटुंबिक कलहाचीही शक्यता या महिन्यात होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे या महिन्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुम्ही चुकीच्या संगतीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा कलंकित होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. या महिन्यात इतरांच्या म्हणण्याने प्रभावित होऊ नका. त्यासोबतच या महिन्यात तुमचे विचार कोणाशीही शेअर करू नका, अन्यथा तुमचे चालू असलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादापासून दूर राहा. या महिन्यात कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय कामात ढवळाढवळ करू नका, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता.


कुंभ (Aquarius Zodiac) 


या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्ही एखाद्या विशिष्ट आजाराने त्रस्त असणार आहात. महिना तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असणार आहे. आरोग्यासंबंधी समस्या जाणवणार आहे. दुसरीकडे, वडिलोपार्जित संपत्तीबाबत कुटुंबात वाद होणार आहे. या महिन्यात निर्णय काळजीपूर्वक घ्या, अन्यथा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही शत्रू पक्षावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी होणार आहात. तुमचे चालू असलेले काम बिघडू शकतं. मानसिकदृष्ट्या या महिन्यात तुम्ही खूप असंतुलित असाल, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला असणार आहे. व्यवसायात स्थिती सामान्य राहणार आहे. या महिन्यात तुम्ही जमिनीशी संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करणार आहात. 


मीन (Pisces Zodiac)  


डिसेंबर महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रात मान-सन्मान मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सामान्य असणार आहे. अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. व्यवसायात परिस्थिती ठीक राहील पण आर्थिक मदत घ्यावी लागू शकते. या महिन्यात तुम्ही कर्ज इत्यादींमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसतील. धार्मिक प्रवासाला जाण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. पत्नी आणि मुलांशी मतभेद वाढतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून अडचणी येऊ शकतात. तुम्ही काही नवीन कामात गुंतवणूक करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे. तसेच कौटुंबिक वादापासून दूर राहा. या महिन्यात शत्रूंपासून सावध राहा. तुमचे चालू असलेले काही काम बिघडू शकते. या महिन्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे चांगले. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)