Monthly Horoscope July 2024 in Marathi : बघता बघता या वर्षातील सात महिना म्हणजे जुलै महिन्याला सुरुवात झाली. या महिन्यात सूर्य, चंद्र, मंगळ, शुक्र आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशी बदल करणार आहेत. याचा परिणाम मेष ते मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यावर पडणार आहे. त्यामुळे जुलै महिना तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मासिक राशीभविष्य आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून (monthly horoscope july 2024 in marathi mesh to meen masik rashifal july 2024)


मेष (Aries July 2024)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला असणार आहे. मात्र व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या महिन्यात व्यवसायात जास्त यश यांना मिळणार नाही. मात्र या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे प्रेम मिळणार आहे. त्याशिवाय पूर्वी ज्या स्वप्नंसाठी तुम्ही संघर्ष करत होत्या ते आता पूर्ण होणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा महिना लाभदायक असणार आहे. कारण या महिन्यात तुम्ही ऑफिसमधील अनेक प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुमच्या बॉसला प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. हा महिना विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश देणारा असणार आहे. कौटुंबिक दृष्टिकोनातूनही हा काळ आनंदी असणार आहे.  


वृषभ (Taurus July 2024) 


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना बदलाचे वर्ष ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल दिसणार आहेत. मोठ्या पदोन्नतीमुळे, तुम्हाला मोठी जबाबदारी म्हणजेच बॉस पद मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यापारी वर्गासाठी मानसिक तणाव असणार आहे. कारण या महिन्यात तुम्हाला कमी नफा मिळाल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कौटुंबिक किंवा भावांसोबत तुमचे वाद होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वाणीवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या महिन्यात तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहे. या महिन्यात तुम्हाला ग्रहांच्या संक्रमणाचे शुभ परिणाम लाभणार आहेत. 


मिथुन (Gemini July 2024)


या महिन्यात, मिथुन राशीच्या लोकांना तुमच्या नोकरीपेक्षा चांगली ऑफर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करणार आहात. जुलै महिना तुमच्यासाठी चांगला आनंद घेऊन आला आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुम्हाला आनंद देणार आहे. जुलै महिना व्यावसायिकांसाठी आर्थिक स्थिती सुधारणारा ठरणार आहे. ज्यामुळे संपत्तीत वाढ होणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमची पत्नी किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबासह बाहेर कुठेतरी किंवा परदेशी सहलीला जाण्याचा बेत आखणार आहात. कुटुंबात, आई किंवा वडिलांना या महिन्यात समाजात सन्मान मिळणार असल्याने घरात आनंदाच वातावरण असणार आहे. या महिन्यात कोणताही बाह्य निर्णय अहंकार दूर ठेवूनच घेणे हिताच ठरणार आहे. या दिवसात अतिउत्साह टाळा. अविवाहितांना या महिन्यात प्रेमाची साथ लाभणार आहे. 


कर्क (Cancer July 2024)   


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना व्यवसायात यशस्वी ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला नाव आणि पैसा दोन्हीमध्ये चांगली कमाई होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ अतिशय शुभ असणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ होणार आहे. अविवाहित राहणाऱ्या लोकांच्या जीवनात प्रेमाच्या जोडीदाराच्या आगमनाने बदल दिसून येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र तुम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी होणार आहात. या महिन्यात तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच हा महिना चांगला असणार आहे. 


सिंह (Leo July 2024) 


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अनेक अर्थाने चांगला असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेमासोबत आनंदी वेळ घालवणार आहात. ज्यामुळे भविष्यात यश मिळविण्यात खूप मदत होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. कुठेतरी लांबच्या सहलीची योजना लाभदायक असणार आहे. नोकरदार वर्गाला या महिन्यात कामाच्या ठिकाणी फायदेशीर बदल दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासात अधिक लक्ष देणे आवश्यक असणार आहे. व्यावसायिकांना या महिन्यात व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 


कन्या (Virgo July 2024)    


या राशीच्या लोकांसाठी जुलै 2024 खूप छान सिद्ध होणार आहे. हा महिना भविष्यासाठी खूप चांगला ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही चांगली बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही लवकरच चांगली गुंतवणूक करण्याचा विचार कराल, जे फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी सहलीलाही जाण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांनाही करिअरमध्ये यश मिळणार आहे. वृद्धांना या महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 


तूळ (Libra July 2024)  


जुलै महिन्याला तूळ राशीचा महिना फार काही खास नसणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. यावेळी, जास्त बोलणे प्रेम संबंध खराब करण्याची शक्यता आहे. म्हणून कोणत्याही चुकीच्या फंदात पडणे टाळा. नोकरी करणाऱ्या प्रोफेशनलला यावेळी गुप्त धन असलेल्या कोणाची मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांना जुलै महिन्यात त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. पैसेही योग्य ठिकाणी गुंतवणे हिताच ठरणार आहे. विवाहित लोक हा काळ चांगला आनंदी वेळ व्यतित करणार आहात. कुटुंबात लहानाचे आगमन होणार आहे. या महिन्यात तूळ राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमात सक्रिय असणार आहेत. दानधर्मात पैसेही खर्च होणार आहेत. या महिन्यात तुम्हाला अहंकार टाळा. 


वृश्चिक (Scorpio July 2024)   


या राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगले नाव कमवणार आहेत. जुलै महिन्यात व्यवसायात तुमचे तारे चमकणार असून नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पदोन्नतीही मिळणार आहे. हा महिना चांगला संपत्तीमध्ये सतत वाढ होणार आहे. या महिन्यात पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रशंसा, यश, सर्व काही मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये पुढे जाणे हिताच ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ प्रणयासाठी तुमच्या अनुकूल असणार आहे. यावेळी आईच्या तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाच आहे. 


धनु (Sagittarius July 2024) 


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना व्यवसायात भाग्यवान ठरणार आहे. कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय उंचीवर जाणार आहे. तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होणार आहे. तुम्ही नोकरीत असाल तर तुमचे तारे तुमची भरपूर प्रशंसा कऱणार आहेत. या महिन्यात धर्म किंवा व्यवसायाशी संबंधित मोठा प्रवास होण्याची शक्यता असून तो यशस्वी होणार आहे. या महिन्यात तुम्ही मोठ्या पार्टीचा भाग होणार असून त्यातून आनंद मिळणार आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगले यश मिळणार आहे. या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळणार आहे. 


मकर (Capricorn July 2024)   


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यात नशिबाचे तारे बदलणारा ठरणार आहे. संपत्तीच्या बाबतीतही या महिन्यात तारे अनुकूल असणार आहे. अचानक कुठूनतरी पैसा मिळण्याचे जोरदार संकेत असणार आहे. यावेळी तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत करणार आहात. मीडिया किंवा जनसंवादाशी संबंधित काम करणाऱ्यांना बढती मिळणार आहे. या महिन्यात तुम्हाला घरात आई किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. जमीन आणि मालमत्ता खरेदीच्या बाबतीत जुलै महिना भाग्यवान असणार आहे. लहान मुलांबाबत सावधगिरी बाळगा, कारण बदलत्या हवामानामुळे त्यांना या दिवसात होणाऱ्या आजारांपासून बचाव करावे लागणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात.  


कुंभ (Aquarius July 2024) 


या राशीच्या लोकांचे लग्न या महिन्यात होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना या महिन्यात मोठी उपलब्धी लाभणार आहे. पदोन्नतीमुळे चांगली वेतनश्रेणी वाढण्याची शक्यता असून यावेळी तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत फिरायलाही जाण्याचे बेत आखणार आहात. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायातही हा महिना यश देणारा ठरणार आहे. यावेळी पालकांच्या आरोग्याची चिंता असणार आहे. या महिन्यात तुम्ही काही धाडसी निर्णयही घेणार आहात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फारशी लाभदायक नाही. त्यामुळे भागीदारीत मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. रोमान्ससाठीही हा महिना चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सावधगिरी बाळगणेही खूप गरजेचे आहे.


मीन  (Pisces July 2024)


या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक असणार आहे. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे भविष्यात चांगले सिद्ध होणार आहे. या महिन्यात कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे. पार्टी-पिकनिकचा आनंदही घेणार आहात. या महिन्यात नक्षत्रे पैशाच्या दृष्टीने अनुकूल असणार आहे. मात्र तरीही सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना अनुकूल सिद्ध होणार आहे. या दिवसात वैवाहिक जीवनात काही अडचणी येणार आहेत. ज्यामुळे प्रकरण आणखी बिघडू शकते. त्यामुळे बोलण्याकडे लक्ष द्या. यावेळी नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)