Morning Tips For Women : असं म्हणतात कुटुंबप्रमुख कुणीही असो, संपूर्ण घराचं आरोग्य, सुख आणि आनंद हा त्या घरातील स्त्री/ महिलेवर अवलंबून असतो. तिच्यामुळंच संपूर्ण कुटुंब एकसंध असतं. तिच्यामुळं घरातील सानथोरांना संस्कारांचा ठेवा मिळतो. तिच्यामुळंच सर्वकाही असतं असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला माहितीये का, धार्मिक मान्यतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार महिलांनी दिवसाच्या सुरुवातीला अर्थात सकाळी काही कामं करणं प्रकर्षानं टाळावं. चुकीच्या कामांमुळं महिलांच्या भरभराट लयास जाण्याची भीती असते. (Morning tips dos and donts for women according to jyotish )


महिलांनी दिवसाच्या सुरुवातीलाच कोणती कामं करु नयेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- असं म्हणतात स्त्री घराची लक्ष्मी असते. त्यामुळं या लक्ष्मीनं उंबरठ्यात, उंबरठ्यावर किंवा बसू नका. असं केल्यास दारिद्र्य येतं. 


- सकाळच्या वेळी चुकूनही घरात कोणाशीही वाद घालू नका. असं केल्यास घरात नांदणारी लक्ष्मी बाहेरची वाट धरते. 


- शास्त्रानुसार उशिरापर्यंत झोपणंसुद्धा गैर आहे. महिलांनीसुद्धा उशिरापर्यंत झोपू नये. आपल्याला उशिरापर्यंत झोप मिळत नाही म्हणून महिलांनी निराशही होऊ नये, स्वत:ची तुलना इतरांशी करु नये. 


हेसुद्धा वाचा : Horoscope 3 December : या राशीच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो!


 


- सर्वकाही असूनही नशिबाला दोष देणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल तर आताच ही सवय सोडा. असं केल्यानं घरात असणारी सकारात्मकता निघून जाते. हे कुटुंबातील प्रत्येकालाच लागू आहे. 


- सकाळी घरातील केर काढण्यापासून कामांची सुरुवात करा. दार, उंबरा स्वच्छ पुसून घ्या. 


- घरात काही रोपं, तुळस असेल तर त्यांना पाणी घाला. सूर्याला अर्घ्य द्या. स्वयंपाकघर ही एक अशी जागा आहे जिथं महिलांचं अधिराज्य असतं. त्यामुळं अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात प्रवेश करा. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी शेगडीला हळद- कुंकू लावून तिची पूजा करा. यामुळं तुम्ही लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा  यांची पूजा करता असं प्रतीत होतं.