Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिचा शुभ योग! `या` राशींवर बरसणार नागदेवता आणि शंकराची कृपा
Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिदेवाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही लोकांवर शंकरदेव, नागदेवता आणि शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.
Nag Panchami 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार ही नागपंचमी अतिशय खास आहे. कारण वर्षांनंतर ग्रह आणि नक्षत्रांचा अद्भुत संयोग घडलाय. सूर्य कर्क राशीत आणि शनि कुंभ राशीत असल्याने शश राजयोग तयार झालाय. केतू आणि चंद्र कन्या राशीत तर राहु मीन राशीत आहे. शुक्र आणि बुध मिळून लक्ष्मीनारायण योग तयार केलाय. त्यासोबत अमृत सिद्धी योग, सिद्धी योग आणि रवियोग निर्माण झालाय. ग्रहांच्या या संयोगामुळे अनेक राशींना लकी ठरलाय. त्यांच्यावर नागदेवताची कृपा होणार आहे. (nag panchami 2024 shani will create auspicious yog these zodiac signs get money)
मेष रास (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस खूप शुभ असणार आहे. तुम्हाला यश मिळणार आहे. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला संपत्तीचा लाभ होणार आहे. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार असून त्या पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
या राशीसाठीही हा काळ शुभ असणार आहे. जीवनातील त्रासातून तुमची सुटका होणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणाग आहे. पदोन्नती मिळणार आहे. सहलीला जाणार आहेत.
हेसुद्धा वाचा - Nag Panchami Wishes in Marathi : नागपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून साजरा करा श्रावणातील पहिला सण
कर्क रास (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांनाही फायदा होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदीच आनंद असणार आहे. कुटुंबात समृद्धी नांदणार आहे. व्यवसायाचा विस्तार होणार असून, नफाही वाढणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत.
वृषभ रास (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांसाठीही नागपंचमीचा दिवस शुभ असणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य लाभणार आहेत. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. आरोग्यही चांगले असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)