Navpancham Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठरलेल्या वेळी ग्रह त्याची राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यावेळी प्रत्येक ग्रहाचा कालावधी वेगळा असतो. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. या राशी बदलाचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्यदेव गुरु धनु राशीमध्ये स्थित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवांचा गुरु, बृहस्पति, त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी स्थितीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे 'नवपंचम राजयोग' तयार होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर घडला आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. जाणून घेऊया नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा आहे. 


मेष रास (Mesh Zodiac)


या राशीमध्ये गुरु पहिल्या घरात तर सूर्य नवव्या भावात स्थित आहे. नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित करार आता साध्य होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसून येणार आहे. 


कर्क राशि (Kark Zodiac)


कर्क राशीच्या लोकांसाठीही हा राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. नोकरदार लोकांबद्दल बोललो तर त्यांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध असतील. व्यावसायिकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी बदल अपेक्षित होणार आहे.


वृश्चिक रास (Vraschik Zodiac)


नवपंचम राजयोगाचाही या राशीच्या लोकांवर अनुकूल प्रभाव पडणार आहे. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जीवनात फक्त आनंद मिळेल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांनाही फायदा मिळू शकतो. अनेक क्षेत्रात यश संपादन करता येईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापारी वर्गाला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)