Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवपंचम योगाला ( Navpancham Rajyog ) शुभ मानण्यात आलं आहे. दरम्यान हे राजयोग ग्रहांचं गोचर, संयोग आणि विविध घरातील स्थानांच्या आधारे तयार होतात. या राजयोगाच्या निर्मितीमुळे नशीब तसंच समृद्धीची साथ मिळते. 


कधी तयार होतो नवपंचम राजयोग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रात, जेव्हा मंगळ आणि शनी उदय एकत्र येतो त्यावेळी नवपंचम राजयोग होतो. खासकरून ज्यावेळी मंगळापासून 5व्या घरात शनी स्थित असतो किंवा मंगळ शनीच्या 9व्या घरात असतो. मंगळ सध्या मिथुन राशीत असून शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनीचा उदय आणि मंगळांचं गोचर यांच्या संयोगाने नवपंचम राज योग ( Navpancham Rajyog ) निर्माण होतो.


दरम्यान हा नवपंचम राजयोग ( Navpancham Rajyog ) काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात काही राशींना भरपूर आर्थिक लाभ तसंच मनाजोग्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया राशी कोणत्या आहे. 


मेष रास ( Aries )


मेष राशी व्यक्तींना या नवपंचम राजयोगाने चांगले परिणाम मिळणार आहेत. धैर्य आणि उर्जा पातळी उच्च असणार आहे. व्यावसायातून चांगला नफा मिळणार आहे. प्रवासातून अनुकूल परिणाम होणार आहेत. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे. 


कन्या रास ( Virgo )


नवपंचम योगाचे तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहे. तुमच्या करिअरसाठी हा राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची प्रगती होईल. तुम्ही पगार वाढीची अपेक्षा करू शकता. मोठ्या कंपनीत नोकरी मिळू शकते. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. 


कुंभ रास ( Aquarius )


नवपंचम राजयोगाचा या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल. नवपंचम योगामुळे नशीब तुम्हाला साथ देईल. काम करताना सतत प्रयत्न करत राहा. मान-प्रतिष्ठा मिळण्याची वेळ आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )