New Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! `या` लोकांना राहवं लागणार सावधान
Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Budh Rahu Yuti : नवीन वर्ष 2024 वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय विशेष आहे. ग्रह आणि नक्षत्रांमधील बदल हे मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम करणार आहे. 2024 मध्ये अनेक ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होणार आहे. ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग निर्माण होणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकीकडे नवीन वर्षात अनेक ग्रहांच्या संयोगामुळे विविध प्रकारचे राजयोग असणार आहे, तर दुसरीकडे काही अशुभ योगही तयार होणार आहे. 2024 मध्ये बुध आणि राहूच्या संयोगामुळे जडत्व नावाचा योग तयार निर्माण होणार आहे. (New Year 2024 due to the alliance of Mercury and Rahu there will be an upheaval in life These zodiac sign people have to be careful Budh Rahu Yuti )
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा बुध आणि राहूचा संयोग होतो तेव्हा जडत्व नावाचा अशुभ योग निर्माण होत असतो. 2024 मध्ये मीन राशीमध्ये बुध आणि राहूची युती होणार असल्यामुळे काही राशींच्या समस्या वाढ होणार आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. 2024 मध्ये 7 मार्चला सकाळी बुध ग्रह मीन राशीत गोचर करणार आहे. राहू आधीच मीन असल्यामुळे जडत्व योग निर्माण होतो आहे.
मेष रास (Aries Zodiac)
2024 मध्ये मेष राशीत बाराव्या घरात जडत्व योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांच्या जीवनात हा अशुभ संयोग टिकून असले तोपर्यंत छोट्या-मोठ्या समस्या त्यांना त्रासदायक ठरणार आहे. आव्हानांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे. कामात अपयश मिळण्याची शक्यता आहे. वाद वाढू शकतात आणि आर्थिक समस्या डोकं वर काढणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
तुमच्या कुंडलीच्या पाचव्या भावात जडत्व योग निर्माण होतो आहे. अशा स्थितीत ते तुमच्यासाठी आव्हाने घेऊन येणार आहे. या काळात अनावश्यक खर्चात वाढ होणार आहे. मनात तणावाची स्थिती असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून, येणारा काळ तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)