Shani Margi : पुढच्या महिन्यात शनी होणार मार्गस्थ; `या` राशींवर घोंगावणार संकट
Shani Margi Effects: वैदिकशास्त्रानुसार, जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. मात्र शनीच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला खूप त्रास होतो. तर अशुभ शनी माणसाला आयुष्यभर त्रास देतो.
Shani Margi Effects: ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. यामध्ये शनि देवाला आणि न्याय देणारा ग्रह आहे असेही म्हटले जाते. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जे लोक आपल्या जीवनात चांगले कर्म करतात त्यांना शनि चांगले फळ देतो, परंतु वाईट कर्म करणाऱ्यांना शनि नेहमीच त्रास देतो.
वैदिकशास्त्रानुसार, जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. मात्र शनीच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला खूप त्रास होतो. तर अशुभ शनी माणसाला आयुष्यभर त्रास देतो.
शनी देव लवकरच होणार मार्गस्थ
शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. शनी देव एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर शनीचा सर्वाधिक प्रभाव पडतो. सध्या, शनी कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत आहेत. येत्या 4 नोव्हेंबर शनी देव मार्गी अवस्थेत फिरणार आहेत. शनी देवांची ही हालचाल काही लोकांसाठी शुभ तर काही लोकांसाठी शनीची ही स्थिती खूप त्रासदायक असणार आहे.
शनी मार्गीचा या राशींना होणार लाभ
शनिदेवाच्या मार्गी स्थितीचा सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो. शनिदेवाच्या प्रत्यक्ष हालचालीचा शुभ प्रभाव विशेषत: मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशींवर होणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे. शनी मार्गी अवस्थेत असल्यामुळे या राशींना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
शनीच्या मार्गी स्थितीमुळे या राशींचं होणार नुकसान
शनीच्या मार्गी स्थितीमुळे काही राशींचं मोठं नुकसान होणार आहे. शनिदेव स्वतःच्या राशी कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर वाईट प्रभाव पडणार आहे. त्याच वेळी, कर्क आणि वृश्चिक राशींवर शनीचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या राशीच्या लोकांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. या काळात तुमची आर्थिक बाबतीत फसवणूक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सावध रहावं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)