Nirjala Ekadashi 2022: `या` 5 राशींसाठी निर्जला एकादशी ठरणार वरदान, होणार माता लक्ष्मीची कृपा
निर्जला एकादशीचं महत्त्व आणि तुमच्या राशीवर त्याचा कसा परिणाम होणार जाणून घ्या....
मुंबई : आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. शुभ योग म्हणजे आज शुक्रवार देवीचा दिवस आहे. त्यामुळे हा अत्यंत शुभ योग मानला जात आहे. निर्जला एकादशीचा हा योग 5 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
5 राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी प्रसन्न राहिल. त्यांना धनप्राप्ती होईल. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा सामावेश आहे. कोणत्या राशींचं आज नशीब फळफळणार आहे.
वृषभ : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकतं. नव्या नोकरीची ऑफर देखील मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात आलेले अडथळे दूर होतील. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आयुष्यात सुख-सुविधा वाढतील. या राशीच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न राहणार आहे.
कन्या : सरकारी नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. ज्यांचं प्रमोशन दीर्घकाळापासून रखडलं त्यांना प्रमोशन मिळेल. आता मनासारख्या गोष्टी घडतील. बदलीचा योग असेल तर तेही मनासारखी बदली करून मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मीची कृपा राहिल त्यामुळे कोणत्याही कामात अडथळा येणार नाही.
तुळ : कामाच्या ठिकाणी तुम्ही चमकाल. ज्याचं लवकरच तुम्हाला चांगलं फळ देखील मिळणार आहे. मेहनत करणं सोडू नका. तुम्हाला यश नक्की मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. पार्टनरमुळे तुमच्या आयुष्यातील कामं आणि प्रॉब्लेम सोपे होतील.
Nirjala Ekadashi: 'या' दिवशी आहे निर्जला एकादशी, उपवास करण्यापूर्वी जाणून घ्या नियम
वृश्चिक : या राशीच्या लोकांना चांगली संधी मिळणार आहे. आलेल्या संधीचं सोनं करा. प्रमोशन-इंक्रीमेंटचा योग आहे. कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि धनलाभाचे संकेत आहेत.
धनु : कामाच्या स्वरुपात मोठा बदल होऊ शकतो. नोकरीची नवी संधी आपल्याला मिळेल. प्रसिद्धी, पैसा आणि सन्मान वाढेल. खर्च वाढतील मात्र तुमच्या हातात पैसे आल्याने तुम्हाला म्हणावा तेवढा आर्थिक भार जाणवणार नाही. मात्र जपून खर्च करा. धार्मिक कार्य घरात होण्याचे संकेत आहेत.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )