Numerology 2024 in Marathi :  हिंदू धर्मातील शेवटचा सण म्हणजे होळी. होळीचा उत्साह देशात वेगवेगळ्या ठिकाणी विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. मथुरा, वृंदावन या ठिकाणी होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. होळीमध्ये रंगांची उधळण, वाईटवर चांगल्याचा विजय, अख्खा देश एका रंगात न्हावून निघतो. होळीचा हा आनंद तुम्हाला द्विगुणीत करायचा असेल तर अंकशास्त्रानुसार काय करायचं याबद्दल सांगण्यात आलंय. रंगांचा संबंध हा अंक आणि ग्रहांशी असल्याने कुठल्या मूलांकासाठी होळीला कुठल्या रंगाचा आणि शिवाय आपलं भाग्य उजळवण्यासाठी काय करावं याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी मार्गदर्शन केलंय. (Holi Numerology Tips What should people with birth date 1 10 19 28 do to brighten their luck on Holi 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकशास्त्रानुसार 1, 10, 19, 28 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचं मूलांक हा 1 असतो. त्यामुळे या 1 मूलांक असलेल्या व्यक्तीने होळीचा आनंद अधिक द्विगुणीत करण्यासाठी काय करावं जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून 


1 मूलांक असलेल्या लोकांनी कुठल्या रंगांनी होळी खेळावी? 


मूलांक 1 ही सूर्याची संख्या आहे. अशा स्थितीत होळीचा आनंदी साजरा करण्यासाठी 1, 10, 19, 28 या जन्मतारखेच्या लोकांनी सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. त्यानंतर एका तांब्याचा कलशात पाणी घेऊन त्यात कुंकू घाला आणि हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्याची पहिली किरण ही सोनेरी असते. अंकशास्त्रानुसार सूर्याचा संबंध हा आपल्या आत्माशी आहे. अशा स्थिती या लोकांनी होळीच्या दिवशी नारगी, पिवळा, लाल, गोल्डन या रंगांसोबत होळीचा उत्साह द्विगुणीत करु शकता. याशिवाय तुम्ही गुलाबी, पांढरा आणि क्रापर रंगांसोबत होळी खेळू शकता. 


या रंगांसोबत होळी खेळल्यामुळे तुमच्या आत्माला मिळेल शांतता आणि आयुष्यात तुमचं लक चमकणार आहे. तुमचं अस्तित्व चमकणार आहे. त्यामुळे या काळात जबाबदारी घ्यायला घाबरु नका. सार्वजनिक ठिकाणी सक्रीय हवा. लोकांना एकत्र करा आणि कुटुंब, मित्र परिवाराला एकत्र करून होळीचा उत्साह साजरा करा. 



होळीच्या दिवशी आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला सूर्य उगवतानाचा फोटो लावा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला तुमच्या वडिलांना काहीतरी भेटवस्तू नक्की द्या. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)