होळीच्या दिवशी 9, 18, 27 या जन्मतारखेच्या लोकांनी होळी खेळताना `हा` रंग टाळा!
Holi NumerologyTips in Marathi : 9, 18, 27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळू नये याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी सांगितलंय.
Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळी म्हणजे रंगांचा उत्साह...या रंगांचा तुमच्या ग्रहांशी आणि तुमच्या जन्मतारखेशी खास संबंध असतो असं अंकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कविता ओझा सांगतात. अंकशास्त्रात अंकासोबत ग्रह आणि त्यांचे रंग सांगण्यात आले आहेत. होळीचा सणाला तुम्ही योग्य रंगासोबत होळी खेळल्यास रंगांचा हा उत्साह तुमच्या आयुष्यातही सुख समृद्धी आणि प्रगती घेऊन येतो. 9, 18, 27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो आणि मंगळाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही काय करायला हवं याबद्दल डॉ. ओझा यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळल्यास तुम्हाला होळीचा आनंद जीवनात सप्तरंगी आनंद घेऊन येईल. (numerology prediction do these upay on holi with people born on date 9 18 27 ank shashtra)
होळीचा दिवशी 9 मूलांक लोकांनी या गोष्टी नक्की कराव्यात!
अंकशास्त्रानुसार 9, 18, 27 या तारखेला ज्यांचा जन्म झालेला असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 9 असतो. मूलांक 9 चा ग्रह मंगळ असून त्याचा रंग असतो लाल. अंकशास्त्रानुसार लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानलं जातं. होळीच्या दिवशी तुम्ही लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करु शकता. तर लाल, नांरगी, पिवळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने होळी खेळू शकता. पण या मूलांकच्या लोकांनी काळा रंगापासून दूर राहावे.
अंकशास्त्रानुसार 9 मूलांकची लोक लवकर शत्रू बनवतात. त्यामुळे या होळीला सगळ्यात पहिले तुमच्यातील ऊर्जेला चॅनेलाईज करायचं आहे. सगळ्यांना एकत्र आणा आणि सगळं विसरुन, नकारात्मक गोष्टी मागे टाकून आणि आपल्या होळीची नवीन सुरुवात करायची आहे.
होळी खेळण्यासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी हनुमानजीची पूजा नक्की करा. शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि लाल फुलं अर्पण करा. हनुमाजीच्या समोर बसून हनुमान चालीसाच पठण करा. यामुळे तुमचं लक मजबूत होईल, मान सन्मान वाढणार आणि तुमच्या ऊर्जेला तुम्ही योग्य दिशेला आणि योग्य जागी चॅनेलाईज करु शकाल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)