October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह गोचर करणार आहेत. यावेळी प्रत्येक ग्रहाची चाल ही खास मानली जाणार आहे. एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या 3 तारखांना ग्रह गोचर करणार आहेत. बुध, शुक्र आणि मंगळ हे 3 ग्रह सलग तीन दिवशी गोचर करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 4 राशींच्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


या तिन्ही ग्रहांच्या गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींना मोठा लाभ मिळणार आहे. यावेळी तुमचं आरोग्य एकदम उत्तम असणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक अडचणींवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.


मिथुन रास


बुध, शुक्र आणि मंगळ ग्रहांच्या गोचरमुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळू शकणार आहेत.  या काळात तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी होणार आहात.


कन्या रास


या ग्रहांच्या गोचरमुळे तुमच्या मनाला शांती लाभणार आहे. कोणता आजार मागे लागला असेल तर त्यापासून तुमची सुटका होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.  पैशांचा स्त्रोत वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तुमच्या पत्नीसोबतचा तणाव किंवा वाद कमी करण्यासाठी तुम्ही अधिक हुशारीने वागाल. 


धनु रास


या राशींच्या व्यक्तींनाही धनलाभ होणार आहेत. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली असल्यास अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या कालावधीत तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )