अक्षय्य तृतीयेला धन योगासह बनणार `हे` 5 योग; `या` राशींच्या आयुष्यात येणार आनंद
Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याचसोबत आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होणार आहे.
Akshay Tritiya 2024 Rashi Bhavishya in Marathi: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या 10 मे रोजी अक्षय तृतीया आहे. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्यासोबत सोने-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संधी निर्माण होणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी अक्षय्य तृतीयेला काही ग्रहांचा संयोग होणार असून अनेक शुभ योग तयार होतायत.
अक्षय तृतीयेला बनणार 'हे' शुभ योग
अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याचसोबत आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होणार आहे. त्याचप्रमाणे शनी मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत असल्याने शश योग आणि मंगळ मीन राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. इतकंच नाही तर चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. यावेळी अनेक शुभ योग एकत्र बनल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. पाहूयात यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.
वृषभ रास (Vrishbha Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप लाभदायर ठरणार आहे. नोकरदार लोकांचे त्यांच्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदे मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही दीर्घकाळ दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
मीन रास (Meen Zodiac)
मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही मिळेल. व्यवसायात गुंतवलेले पैसे आता परत मिळू शकतात.
मेष रास (Mesh Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिकांमधील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता. स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल.कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )