Palmistry for Foreign Travel: हस्तरेषाशास्त्र भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून भविष्यातील अनेक घडामोडींबाबत भाकीतं केली जातात. कुंडलीशास्त्र किंवा अंकशास्त्र यावर जसा नवग्रहांचा प्रभाव असतो अगदी तसेच हस्तरेषांवरही नवग्रहांचा प्रभाव असतो. हाताचा आकार, बोटं, अंगठा, नखं, शुक्र कंकण, शनिकंकण, गुरुकंकण, रविरेषा, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा आणि मणिबंधरेषा यांचा अभ्यास केला जातो.  हातावरील रेषा परदेश प्रवासाविषयीही सांगतात. एखादी व्यक्ती परदेशात जाऊ शकते की नाही? जर एखादी व्यक्ती परदेश दौऱ्यावर जाणार असेल तर प्रवास किती वेळा करेल? एवढेच नाही तर काही वर्षे परदेशात राहिल्यानंतर ती व्यक्ती परत येईल किंवा परदेशात मृत पावेल हेही कळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हस्तरेषांवरून परदेश प्रवासाचे योग बघा


  • हस्तरेषा शास्त्रानुसार जर चंद्र पर्वतावरून एखादी रेषा निघून भाग्यरेषा ओलांडून जीवनरेषेला भेटत असेल. तर अशी व्यक्ती अनेक देशांत फिरते.

  • जर जीवनरेषा उलटून चंद्र पर्वतावर पोहोचली तर ती व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात फिरते. त्यांचा मृत्यूही त्याच्या जन्मस्थानापासून दूर  होतो.

  • जर एखादी रेषा मणिबंध सोडून मंगळाच्या पर्वताकडे जाते, तर अशा व्यक्ती सागरी प्रवास करतात. असे लोक नौदलात असण्याची शक्यता जास्त असते.

  • जर एखादी रेषा पहिल्या मणिबंधाच्या वर चंद्राच्या पर्वतापर्यंत गेली तर अशा लोकांचा प्रत्येक प्रवास यशस्वी होतो. त्याला ट्रॅव्हल्समधून भरपूर पैसे मिळतात.

  • जर व्यक्तीच्या उजव्या हातात परदेश प्रवास करण्याच्या रेषा असतील, परंतु डाव्या हातात नसतील, तर अशा लोकांच्या आयुष्यात परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होते, प्रत्यक्षात प्रवास होत नाही.

  • प्रवास रेषा तुटक असल्यास अशा लोकांसोबत अपघात होण्याची शक्यता असते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)