मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाला खूप महत्त्व आहे. लग्नाचा निर्णय घेणं ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नसते. लग्नाआधी प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही ना काही विचार चालू असतात. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो की तुमचा जीवनसाथी वागणूकीच्या बाबतीत कसा असेल आणि तो तुमच्यासाठी किती भाग्यवान असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान समुद्रशास्त्रानुसार, मुलीची बोटं पाहूनही तुम्ही तिच्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगू शकता.


बोटांच्या माध्यमातून जाणून घ्या मुलीचा स्वभाव कसा आहे


समुद्रशास्त्रानुसार, बोटं पाहून तुम्ही मुलीशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता. ज्यावरून तुम्हाला अंदाज येईल की लग्नानंतर तुमचं नशीब किती बदलणार आहे.


गोल आणि लांब बोटं


ज्या मुलींची बोटं गोलाकार आणि लांब असतात, त्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. शिवाय अशा मुली आपल्या पतींसाठी नशीब बदलणाऱ्या ठरतात.


बोटं छोटी असणाऱ्या मुली


जर एखाद्या मुलीची बोटं लहान असतील तर त्याचा अर्थ की, लग्नानंतर तुम्हाला बचत करणं खूप कठीण होणार आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा मुली खूप खर्चीक स्वभावाच्या असतात.


बोटं सांगतात वैवाहिक जीवन कसं असेल


जर मुलीच्या हाताच्या बोटाचा पुढचा भाग पातळ असेल तर समजा तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंददायी जाणार आहे. तुमचं आयुष्य खूप आनंदाने आणि शांततेत व्यतीत होण्याची शक्यता आहे.


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)