Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?
Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?
Mahashivratri 2024 Date : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्यात ग्रह आणि नक्षत्राचा खेळ पाहता अनेक शुभ आणि अशुभ काळ येत असतो. त्यातच दर महिन्यात अशुभ असा पंचक येत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात म्हणजे 5 दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य केले जातं नाही. घरबांधणी, टोनसुर, यज्ञविधी इत्यादी कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्यासाठी वेळ पाहिली जाते. त्या कार्याचं उत्तम फळ मिळावं म्हणून शुभ काळात ते कार्य केलं जातं. मार्च महिन्यात पंचक हे 8 मार्चपासून सुरु होणार आहे. मग अशा स्थिती 8 मार्चला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री ही महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलन म्हणजे विवाह सोहळाचा दिवस. महाशिवरात्री अख्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी पूजा, रुद्राभिषेक अनेक शुभ कार्य केली जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला पंचक असल्याने त्यादिवशी पूजा करायची की नाही किंवा त्या पूजेवर काही परिणाम होईल का? (Panchak 2024 March Panchak starts from Mahashivratri what will be the effect on worship)
महाशिवरात्री आणि पंचक एकत्र असल्याने काय होणार?
पंचक काळात शुभ कार्य होत नाहीत मात्र महादेव शिव हे देवांचे देव आणि काळाचे महाकाल मानले जाते. ज्योतिषशास्त्र पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितल्यानुसार पंचक काळात महादेवाची पूजा आणि अभिषेक यावर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट केलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला शिवभक्तांना पूजा आणि अभिषेक भक्तीभावाने करता येणार आहे.
हेसुद्धा वाचा - Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी
मार्चमध्ये चोर पंचक
पंचांगानुसार मार्च महिन्यातील पंचक शुक्रवार 8 मार्चला रात्री 09:21 वाजेपासून मंगळवार 12 मार्चला रात्री 08:30 वाजेपर्यंत असणार आहे. मार्च 2024 चा पंचक हा चोर पंचक असणार आहे. चोरपंचक दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
पंचकमध्ये 'हे' काम करू नका!
पंचक काळात वास्तू पूजा, नामकरण समारंभ, विवाह, घरबांधणीची सुरुवात इत्यादी कार्ये केले जात नाही. याशिवाय लाकूड किंवा लाकडी वस्तू खरेदी करणे, पलंग खरेदी करणे, छताचे साचे लावणे, पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे अशुभ मानले जाते. प्रवास करणे आवश्यक असल्यास, प्रवास करण्यापूर्वी, आपण काही पावले मागे जाऊ शकता आणि नंतर या दिशेने प्रवास सुरू करु शकता, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रात फिरतो तेव्हा त्याला पंचक असं म्हटलं जातं. या नक्षत्रांना ओलांडण्यासाठी चंद्राला सुमारे 5 दिवस लागतात. त्यामुळे 5 दिवस पंचक काळ पाळला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)