Pausha Putrada Ekadashi 2025 :  नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पौष पुत्रदा एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. एकदाशी तिथी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवारी 10 जानेवारी 2025 ला एकादशीचं व्रत साजरं करण्यात येणार आहे. यादिवशी अत्यंत दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. यादिवशी ब्रह्ययोग, शुभ योग आणि गजकेसरी योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. कोण आहेत त्या भाग्यशाली राशी पाहूयात. 


मेष रास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी पौष पुत्रदा एकादशी खूप शुभ असणार आहे. एकादशी या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरणार आहे. करिअरच्या क्षेत्रात चांगले बदल तुम्हाला दिसणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहेत. भाऊ-बहिणींचेही सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तब्येत सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन लाभणार आहेत. तसंच भगवान विष्णूच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होणार आहेत. 


तूळ रास 


या राशीच्या लोकांसाठी ही एकादशी तिथी खूप आनंद सिद्ध होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात चांगले बदल पाहणार आहेत. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन प्राप्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. परदेश व्यापारात विस्तार होण्याचे शुभ संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदी आनंद असणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. 


मीन रास 


एकादशी तिथी या राशीच्या लोकांसाठी आनंदाची भेट घेऊन आला आहे. या काळात तुम्ही केलेल्या योजना यशस्वी होणार आहेत. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. व्यवसायातही फायदा होईल. तब्येत सुधारणा पाहिला मिळणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. करिअरमध्ये नवीन संधी चालून येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी कानावर पडणार आहे. मीन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश लाभणार आहे. एकूणच या दिवसापासून तुमचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)