जन्मतारखेत हा अंक असलेल्या व्यक्ती असतात फार हट्टी; जाणून घ्या तुमची जन्मतारीख तुमच्याबद्दल काय सांगते!
तुमच्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणि तो कोणत्या प्रकारचा आहे हे अंकाच्या माध्यमातून कळू शकतं.
मुंबई : अंक ही संख्याशास्त्रातील मुख्य संख्या आहे. ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो. तुमच्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणि तो कोणत्या प्रकारचा आहे हे अंकाच्या माध्यमातून कळू शकतं.
टॅरो कार्ड रीडर तज्ज्ञांच्या मते, अंक किंवा जन्मतारखेच्या आधारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे जाणून घेऊ शकता.
अंक 1- या लोकांना नेहमी नंबर वन असावं लागतं. हे लोक खूप मेहनती असतात आणि प्रत्येक गोष्टीत खूप मेहनत घेतात.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक कधीकधी खूप स्पर्धात्मक बनतात. अनेक वेळा या लोकांमध्ये अहंकाराची समस्या दिसून येते.
अंक 2- हे लोक खूप सर्जनशील असतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता अगदी योग्य असते. ते खूप रोमँटिक आहेत. त्यांचा स्वतःवर खूप आत्मविश्वास असतो.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक खूप भावनिक आणि मूडी असतात. हे लोक जर एखाद्या गोष्टीत हरले तर त्यांना पराभव सहन होत नाही.
अंक 3- या व्यक्ती खूप चांगल्या सल्लागार असतात. ते खूप छान गोष्टी समजावून सांगतात. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अगदी योग्य आहे तसेच हे लोक खूप मेहनती असतात.
निगेटिव्ह पॉइंट- अनेक वेळा हे लोक खूप हट्टी होतात, त्यांना जे करायचे आहे ते ते करतात. ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवण्यास सक्षम नाहीत, जे त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही मुद्दे आहेत.
अंक 4- या लोकांच्या कल्पना खूप चांगल्या असतात. ते गोष्टींचा खूप खोलवर विचार करतात. हे लोक खूप मेहनती असतात.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक कल्पना पूर्ण करण्याऐवजी मध्येच सोडून देतात. हे लोक लोकांच्या चर्चेत खूप लवकर अडकतात.
अंक 5- अशा व्यक्तींचं मन अतिशय कुशाग्र असतं. हे लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात. हे लोक आपले पैसे काळजीपूर्वक खर्च करतात.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर कंटाळा करतात आणि स्वतःची इतरांशी तुलना करू लागतात.
अंक 6- यांना त्यांच्या आयुष्यात फक्त सुंदर गोष्टी आवडतात. त्याला जे काही काम वाटतं, ते उत्तम प्रकारे पूर्ण करतात. कुटुंबाला सोबत घेण्यावर विश्वास आहे.
निगेटिव्ह पॉइंट- या लोकांची इच्छाशक्ती खूप कमकुवत असते.
अंक 7- या अंकाचे लोक संशोधनमध्ये हुशार असतात. हे लोक विचार करून निर्णय घेतात.
निगेटिव्ह पॉइंट- कधी कधी हे लोक गोष्टींचा जास्त विचार करायला लागतात. तसंच या लोकांमध्ये आत्मविश्वास देखील कमी असतो.
अंक 8- हे लोक खूप मेहनती असतात, त्यांना धोका पत्करण्यात मजा येते. त्यांच्यात संयम आहे तसंच त्यांची इच्छाशक्तीही खूप प्रबळ आहे.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक कधीकधी चुकीचे निर्णय घेतात. त्यांच्यासाठी काही वेळा कुटुंबाची काळजी घेणं खूप कठीण होतं.
अंक 9- या लोकांना साहस करायला आवडतो. हे लोक खेळातही चांगले असतात. हे लोक त्यांच्या आरोग्याचीही जास्त काळजी घेतात.
निगेटिव्ह पॉइंट- हे लोक उधळपट्टीने कधी कधी थोडा जास्त खर्च करतात.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)