Personality Test : तुमच्या पायाची पाचही बोटं ठरवतात तुमच्या सेक्स लाइफबद्दल!, जाणून घ्या कसं…
Foot Finger Palmistry : आपण कसे बोलतो, कसे वागतो यावर आपला स्वभाव कळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या शरीराचे अवयवदेखील तुमच्या स्वभावाचे गुपित उघड करतात. कसं ते जाणून तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल.
Personality Test Foot Finger Palmistry In Marathi : आताच पाहून घ्या तुमची पायाची बोट कशी आहेत ती, कारण इतर लोकांना तुमचा स्वभाव, तुमचं सेक्स लाइफ कळू शकतं. त्यामुळे तुमच्या लाइफचं हे गुपित इतरांना कळण्याची जाणून घ्या काय सांगत शास्त्र? ज्योतिषी, हस्तरेषा, अंकशास्त्र यातून आपलं भविष्य आणि आयुष्यातील अनेक रहस्य समोर येतात. तळहाताप्रमाणे आपल्या पायाची बोटं सुद्धा आपलं भविष्य सांगतात. (Personality Test Foot Finger Palmistry Your five toes determine your sex life astrology In Marathi)
पायांची सर्व बोटं समान
नीट बघा तुमच्या पायांची सर्व बोटं समान तर नाही ना? तर तुमच्या घरात कधी लक्ष्मीची कमी राहत नाही. धन धान्यानी तुमचं घर भरलेलं असतं. ही व्यक्ती कलेशी निगडीत असते. अशा व्यक्ती प्रत्येक काम मन लावून शेवटपर्यंत नेतात.
तर्जनी अंगठ्यापेक्षा लांब
जर तुमच्या पायाच्या बोटांची तर्जनी अंगठ्यापेक्षा लांब असेल तुम्ही भाग्यशाली असाल. अशी व्यक्ती हुशार, बुद्धिमान, उत्साही तर असतातच पण ते खूप भावूक असतात. त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि ते सदैव आनंदी राहतात. त्यांना वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळतो.
अंगठा आणि बोटांमधील अंतर
आता आम्हाला सांगा तुमच्या अंगठा आणि बोटांमधील अंतर किती आहे? कारण समुद्रशास्त्रानुसार अशी व्यक्ती एकांतात राहणं पसंत करतात. बोटांमध्ये अंतर असेल तर अशा लोकांना पैशांची चणचण भासते. त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागते. या व्यक्तींना घराजी सजावट करायला खूप आवडत.
तळव्याची रचना
तुमच्या तळव्याची रचनाही तुमचं भाग्य सांगते, असं समुद्रशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमचे तळवे स्वच्छ, नाजूक असेल तर नशिबवान असता. धन, वैभव, मान, सन्मान, प्रसिद्धी सगळं मिळतं तुम्हाला आयुष्यात. ही लोकांना कायम नशीबाची साथ मिळते.
(वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)