Pitra Dosh Upay: घरातील पितृदोषाबाबत असे मिळतात संकेत, करा हे उपाय...
Pitra Dosh Upay: अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. हे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.
Pitra Dosh Upay: आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूत काही दोष असतील तर त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर त्वरीत उपाय करणे गरजेचे आहे. अनेकवेळा घरात पितृदोष (Pitru Dosh) आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या (Vastu Shastra)दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत.
ज्योतिषशास्त्रात मरण पावलेल्या पूर्वजांची नाराजी अशुभ मानली गेली आहे. असे मानले जाते की, पूर्वज अशांत असतील तर त्यांच्या कोपामुळे घरात अशांतता निर्माण होते. वातावरण चांगले नसते. याचे काही संकेत मिळत असतात. त्यामुळे असे संकेत मिळाले तर घरातील पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.
घरातील पितृदोषामुळे कुटुंबातील लोकांचे आयुष्यात काही बिघात होतात. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासोबतच वैवाहिक जीवनात तणाव, आर्थिक समस्या आणि मुलांशी संबंधित समस्या निर्माण होतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून काही संकेत मिळतात. त्यावरुन समजू शकतं की, आपले पूर्वजनाराज आहेत. अशा परिस्थितीत काय करणे योग्य हे जाणून घेतले पाहिजे.
घरात पिंपळ झाड उगवले असेल तर..
वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, घरात पिंपळाचे झाड लावणे अशुभ मानले जाते. घरामध्ये पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. तुमचे मृत पूर्वज म्हणजे पितर देव तुमच्यावर नाराज असल्याचा तो एक संकेत मिळतो. यावर उपाय म्हणजे कोणत्याही सोमवारी पिंपळाचे झाड मुळांसह उपटून नदीत टाकावे. तसेच अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करणे चांगले. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असे केल्यानं मृत पितर सुखी होतात. परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते.
एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणे
आपण जर एखाद्याबाबत किंवा कामाबद्दल जास्त विचार करत असू ते चांगले नाही. आपण कुठेतरी फसलो आहोत, असे वाटत असेल तर ते चांगले लक्षण नाही. यामागे पूर्वज दोष असू शकतो. याबाबत हे संकेत असतात असे ज्योतिष्यशास्त्रात सांगितले आहे.. अनावश्यक अतिविचार माणसाला वेडा बनवू शकतो. अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होते. अशा वेळी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करावे. अशी नियमित दिनचर्या केली तर कुंडलीचा चंद्र दूषित होतो आणि तुमचे संकट दूर होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)