Pitru Paksha 2022 : पितृपक्षात `अशा` परिस्थितीत कावळे दिसल्यास भरभराट होणार की आणखी काही?
Pitru Paksha दरम्यान, कावळ्यांपुढे का ठेवलं जातं जेवणाचं पान?
Pitru Paksha 2022 : सध्या पितृपक्ष सुरु आहे. कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आणि त्यांच्याकडून आपल्या कुटुंबाला शुभाशीर्वाद मिळावेत यासाठी पूर्वजांच्या नावे या काळात श्राद्ध घातलं जातं. तर्पण श्राद्धासोबतच कुटुंबातील मंडळी एकत्र येऊन गेलेल्यांसाठी प्रार्थना करतात. यावेळी त्या व्यक्तींच्या आवडीचे पदार्थ तयार करुन जेवणाचं पान त्यांच्या नावानं घराबाहेर ठेवलं जातं. (Pitru Paksha 2022 crow signifiacance importance read details )
जेवणाचं पान ठेवल्यानंतर ते जोवर एखादा कावळा स्पर्श करत त्यातला एखादा पदार्थ खात नाही, तोवर सर्वच मंडळी पानापासून दूर उभे राहून हे सर्व पाहताना दिसतात. सहसा कावळा पानाला स्पर्श करेपर्यंत घरात कोणालाही यादरम्यान जेवण दिलं जात नाही.
पितृपक्षात (Pitru Paksha ) कावळ्याला फार महत्त्वं. त्याच्याशीच संबंधित काही चिन्हं शुभ- अशूभाचे सूचक असतात. आत ते मानणं न मानणं हा वैयक्तिक प्रश्न. पितृपक्षात घरावर, खिडकीपाशी येणारे कावळे कुटुंबाला (Family) आशीर्वाद देण्यासाठी येतात असं म्हटलं जातं. काहींच्या मते हे आपले गेलेले पूर्वजच असतात.
जेवणाचं पान ठेवल्यानंतर त्याभोवती दोन- तीन कावळे एकत्र आल्यास तुमच्या पुढच्या पिढ्याही सुखात जगतील असा इशारा यातून मिळतो असं म्हणतात.
Palmistry : तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, या उपायांनी होईल खास लाभ
पितृपक्षात घरापाशी बरेच कावळे (Pitru Paksha crow) आल्यास ते भरभराटीचा इशारा देतात. पूर्वजांपर्यंत सेवा पोहोचत असून हे त्यांचेच आशीर्वाद ठरतात. असंही म्हणतात की, ठेवलेलं जेवण कावळे लगेचच खाण्यासाठी आले तर तुमचे पूर्वज समाधानी आहेत अशी मान्यता आहे.
या दिवसांमध्ये तुम्हाला एखादा कावळा चोचीतून वाळलेली पानं, बारीक काड्या, कागद नेताना दिसल्यास घरात पैसे येण्याचा इशारा यातून मिळतो