Pitru Paksha 2022: हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. कारण पितृ पंधरवड्यात दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रुपाने पूजन केलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून पितृ पंधरवड्याला सुरुवात होते. या वर्षी पितृ पक्ष (Pitru Paksha) 10 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी संपेल. हिंदू धर्मग्रंथानुसार पितृ पक्ष पितरांना पिंड दान करण्यासाठी समर्पित आहे.  या काळात आपल्या पूर्वजांना तर्पण देत त्यांचं स्मरण केलं जातं. जर तुम्हाला तुमच्या दिवंगत व्यक्तींची तिथी माहिती असेल तर त्या दिवशी विधीवत पूजन केलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pitru Paksha 2022 तिथी:


  • 10 सप्टेंबर 2022 : पौर्णिमा श्राद्ध, भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा

  • 11 सप्टेंबर 2022 : द्वितीया श्राद्ध

  • 12 सप्टेंबर 2022 : तृतीया श्राद्ध

  • 13 सप्टेंबर 2022 : चतुर्थी श्राद्ध

  • 14 सप्टेंबर 2022 : पंचमी श्राद्ध

  • 15 सप्टेंबर 2022 : षष्ठी श्राद्ध

  • 16 सप्टेंबर 2022 : सप्तमी श्राद्ध

  • 18 सप्टेंबर 2022 : अष्टमी श्राद्ध

  • 19 सप्टेंबर 2022 : नवमी श्राद्ध

  • 20 सप्टेंबर 2022 : दशमी श्राद्ध

  • 21 सप्टेंबर 2022 : एकादशी श्राद्ध

  • 22 सप्टेंबर 2022 : द्वादशी श्राद्ध

  • 23 सप्टेंबर 2022 : त्रयोदशी श्राद्ध

  • 24 सप्टेंबर 2022 : चतुर्दशी श्राद्ध

  • 25 सप्टेंबर 2022 : अमावस्या श्राद्ध, सर्वपित्री अमावस्या


पितृपक्षात पिंडदानाला महत्त्व आहे.  पितृ पंधरवड्यात लग्न, मुंडण, गृहप्रवेश, घरासाठी नवीन वस्तू खरेदी करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.


कुंडलीत पितृदोष असेल तर 'हे' उपाय करा


कुंडलीत पितृ दोष असेल तर त्याच्या निवारणासाठी पितृ पक्षात केलेले उपाय फार प्रभावी ठरतात. अशा परिस्थितीत पितृदोषाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. सर्वपित्री दर्श अमावास्येच्या दिवशी काळे तीळ, पांढरे चंदन, पांढरी फुले पाण्यात टाकून पिंपळाच्या मुळास अर्पण करा. यानंतर झाडाजवळ शुद्ध देशी तुपाचा दिवा लावताना ‘ॐ सर्व पितृ देवाय नम:’ या मंत्राचा जप करावा, यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.


पितृदोषाने पीडित व्यक्तीने घराच्या दक्षिण भिंतीवर पितरांचा फोटो लावून त्यांना फुलांचा हार घालून त्यांची पूजा करावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितरांच्या मृत्यूच्या तिथीला गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा द्यावी.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)