Food in Shradh Pitru Paksha : सध्या पितृपक्ष पंधरवरडा सुरु असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत तो असणार आहे. पितृपक्षात पितरांच्या म्हणजे पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवसांमध्ये तिथीनुसार पिंडदान, श्राद्ध, तर्पण करण्यात येतं. धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की, या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वीतलावर येतात. त्यामुळे ज्या तिथीला आपल्या घरातील व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यादिवशी त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात येतो. या श्राद्ध तिथीला अनेकांकडे घरातील लोकांशिवाय बाहेरील परिचीत आणि नातेवाईकांना जेवण्यासाठी आमंत्रण दिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काही लोक श्राद्धाच्या जेवण्यास जात नाही. त्यामागे त्यांचा समज असतो की, श्राद्ध भोजनाने दोष लागतो किंवा श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होतं. पण धर्मशास्त्र नेमकं काय सांगतात याबद्दल आज आपल्याला सांगणार आहेत, ज्योतिषाचार्य पंडित आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर. 


श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? 


आनंद पिंपळकर यांनी हा संभ्रम दूर करण्यासाठी दोन आख्यायिका सांगितल्या आहेत. पहिली आख्यायिका अशी आहे की, ही घटना आहे सन 1319 ची महालया अमावस्याचा दिवस म्हणजे भाद्रपद अमावस्या. त्यादिवशी शुक्रवार होता आणि उत्तर नक्षत्र होता. इंग्रजी तारखेनुसार 22 सप्टेंबर 1319. त्यादिवशी दुपारी 12 वाजता श्री दत्तात्रयांची मध्यान्ह भिक्षेची वेळ होती. 


पिठारूपामध्ये अप्पाराव शर्मा पितृपक्ष पूजेत व्यस्त होते. स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध जेवणाची तयारी सुरु होती. निमंत्रित तीन ब्राम्हन अतिथी भोजनाची येण्याची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात घराच्या दारातून आवाज आला भवति भिक्षां देहि...


क्षाद्धाच्या दिवशी पितृ आणि निमंत्रित लोकांचं जेवण झालं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे नियमाच्या विरुद्ध मानलं जातं. पण सुमती माता अनुसयाचे सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्माची सुशिला होत्या. त्यात काही दिवसांआधी वडिलांनी म्हणजे बापन्नाचार्यांनी सांगितलं होतं की दत्त कोणत्याही रुपामध्ये तुझ्या घरी भिक्षेला येतील. त्यांना खाली हात पाठवू नको.


हे आठवून माता सुमती श्राद्ध जेवणातील पदार्थ घेऊन भिक्षा देण्यासाठी दारात आली. समोर अवधूत उभे होते. त्यांनी विचारलं माते तुझी मनोकामना सांग. सुमती दत्ताचीच आई. दत्तप्रभू 100 वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रुपात दर्शन देत आहेत. मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. हे ऐकताच अवधूत हे हसले आणि श्रीपाद श्रीवल्लभ रुप दाखवलं. 


हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2024 : श्राद्धादरम्यान कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं? वड आणि पिंपळाशी काय आहे संबंध? जाणून घ्या शास्त्रीय कारण


भान हरपून सुमती मातेने श्रीपाद यांना आष्टांग दंडवत घालताच ते म्हणाले तुझी इच्छा सांग, सुमती माता म्हणाली, आता तू मला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी जन्माला ये. अथास्तू म्हणत श्रीपाद निघून गेले. त्यानंतर 1320 सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेला दिव्य ज्योती स्वरुपात अवतरले. 



अशा श्राद्धाचं जेवण कस काय अपवित्र असू शकतं. त्यामुळे गैरसमज दूर करा आणि श्राद्ध जेवणाचं निमंत्रण आल्यास आवार्जून जा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )