Pitru Paksha 2024 : दरवर्षी गणेशोत्सवानंतर पितरांना प्रसन्न करण्यासाठी पंधरा दिवस समर्पित करण्यात आले असतात. याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हटलं जातं. सध्या पितृपक्ष सुरु आहे. त्यामुळे पितरांच्या शांतीसाठी घराघरामध्ये तिथीनुसार नैवेद्य केला जातोय. हिंदू धर्मानुसार पितरांपर्यंत हे नैवेद्य कावळ्यामार्फेत पोहोचतो अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की, पूर्वज कावळ्याच्या स्वरुपात आपल्याकडे येतात. जगात असंख्य पक्षी आहे मग आपण कावळ्यालाही का अन्न देतो यामागील मागील कारण माहितीय का? खरं तर यामागे शास्त्रीय कारण आहे, चला तर मग जाणून घेऊयात.
कावळ्याला यमराजाचं दूत असल्याचं मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, कावळा नैसर्गिकरित्या मरत नाही. त्याचा अपघाती मृत्यू होतो. तसेच कावळ्याचा मृत्यू झाला की, त्याचे साथीदार अन्न खात नाहीत, अशी मान्यता आहे. तसेच यमाने कावळ्याला वरदान दिलं आहे की, तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल. त्यामुळे पितृ पक्षात कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे. कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो. या काळात पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात अशी समज आहे. या भावनेतून कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवले जातात.
पितृपक्ष, कावळा, वड आणि पिंपळाचा घनिष्ठ संबंध आहे. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. तुम्हाला माहितीय वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष असे आहेत, जे दुपटीने प्राणवायूचे उत्सर्जन करतात. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा अर्थात माणसांनी बी पेरून केली उगवतात. मात्र केवळ वड आणि पिंपळ ही दोनच वृक्ष अशी आहेत, जी प्रत्यक्षात बीज पेरून उगवत नाहीत. हे जाणून आश्चर्य वाटल ना, पण हे खरं आहे. मग ही झाडं उगवतात कशी तर आम्ही सांगतो.
या दोन्ही झाडांची अगदी नुकतीच अंकुर स्वरूपातील फळं ही फक्त आणि फक्त कावळे खातात. इतर कोणताही पक्षी हे फळ खात नाही. त्यानंतर कावळ्याच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते. त्यानंतर कावळा ज्या ठिकाणी विष्ठा करतात, त्याच विष्ठेतून वड किंवा पिंपळाचे हे वृक्ष निर्माण होतात.
या अर्थ कावळे जिंवत राहिले तर वड आणि पिंपळ जिवंत राहतात. सगळ्यात महत्त्वाच भाद्रपद महिना हा कावळ्यांचा प्रजनन अर्थात अंडी देण्याचा काळ असतो. त्यामुळे त्यांना घराघरामधून पोषक आहार मिळावा म्हणून पितृपक्षात कावळ्याला अन्न दिलं जातं. म्हणजे सृष्टीचक्र कायम सुरु राहण्यासाठी प्रत्येक सणाला आणि विधीला महत्त्व आहे. म्हणूनच काय आपल्याच संतांनी अथवा शास्त्रकारांनी याबाबत ही पितृपक्षाची तजवीज करुन ठेवली असेल. आता तुम्हीही धर्माच्या जाळ्यात न अडकता शास्त्रीय कारण जाणून भाद्रपद महिन्यात कावळ्यांना पौष्टिक अन्न खायला द्या.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)