Pitru Paksha 2024 : सप्टेंबर महिना हा गणेशाच आगमन आणि त्यानंतर पितृपक्ष पंधरवडा असणार आहे. 7 सप्टेंबर 2024 ला बाप्पाच प्राणप्रतिष्ठापना होणार असून 17 सप्टेंबरला 2024 ला गणेशाला निरोप दिला जणार आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. पितृपक्षात पितर पृथ्वीवर अवतरतात असं शास्त्रात मानलं जातं. त्यामुळे पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत असतो. या दिवसांमध्ये पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंड दान इत्यादी केलं जातं, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात. पण, यावेळी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पितृपक्षातच असणार आहे. त्यामुळे पितरं श्राद्ध स्वीकार करतील का? असं प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. याच प्रश्नाच निरासन करण्यासाठी आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय. (pitru paksha lunar and solar eclipse effect ancestors accept shradh astrology in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 सप्टेंबर प्रतिपदा श्राद्धाने पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. या वर्षातील दुसरं चंद्रग्रहणही याच दिवशी असल्यामुळे हा पितृपक्ष फारसा शुभ असणार नाही. वर्षातील दुसरं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे ते सुतक मानलं जाणार नाही. पण, पितृपक्षावर त्याचा प्रभाव राहणार आहे. 


प्रतिपदा तिथीला श्राद्ध करावं का?


भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण सकाळी 6.12 वाजेपासून सकाळी 10.17 वाजेपर्यंत असणार आहे. ज्योतिषाने सांगितलं की या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, तरीही प्रतिपदेला श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने ग्रहणाचा कालावधी संपेपर्यंत श्राद्ध करू नये असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. ग्रहणाचा मोक्ष कालावधी संपल्यानंतरच प्रतिपदेचे श्राद्ध सुरु करावं. 


पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण


ज्योतिषींनी सांगितलंय की, यावेळी पितृपक्ष ग्रहण कालावधीपासूनच सुरू होणार आहे आणि समाप्त ग्रहणानेच होणार आहे. त्यामुळे यंदाचा पितृपक्ष शुभ मानला जात नाहीय. या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटी म्हणजेच 2 ऑक्टोबरला असणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातही दिसणार नाही. यामुळे, सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही. भारतीय वेळेनुसार, वर्षातील दुसरं सूर्यग्रहण रात्री 9.13 वाजेपासून मध्यरात्री 3.17 वाजेपर्यंत असणार आहे. 


पितृपक्षातील चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण शुभ की अशुभ?


या वर्षी पितृपक्षात एकाच बाजूला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होणार आहे. जरी हे दोन्ही ग्रहण भारतात दिसत नसले तरी अध्यात्मिक दृष्ट्या याचा परिणाम प्रत्येक मानवावर होणार आहे, जो शुभ मानला जात नाही. कारण शास्त्रानुसार एकाच बाजूला दोन ग्रहण लागणे हे शुभ मानले जात नाही. त्यामुळे पितृपक्षातील ग्रहणाची छाया अशुभ मानली जाणार आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतात.