Rahu Gochar 2023 : 3 महिन्यांनी राहू मार्ग बदलणार; `या` राशींचं नशीब चमकणार!
Rahu transit 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. राहू ग्रह हा राशी बदल करणार आहे. मीन राशीत राहूचं गोचर होणार आहे. याचा इतर राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहुया.
Rahu transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं गोचर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. याचा सर्व राशींवर परिणाम होताना दिसतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. दरम्यान असाच बदल आगामी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी राहू ग्रह हा राशी बदल करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार राहू अशुभ ग्रहांमध्ये गणला जातो. त्याचप्रमाणे याला मायावी ग्रह म्हणून देखील मानलं जातं. राहू नेहमी उलट दिशेने राशी बदलतो. मीन राशीत राहूचं गोचर होणार आहे. याचा इतर राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहुया.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी मीन राशीतील संक्रमण महत्त्वाचं ठरणार आहे. आर्थिक समस्या सुटू शकतात. अनपेक्षित धनासाठी हा काळ लाभदायक राहील. यासोबतच प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुमच्यामध्ये साकारात्मक उर्जेचा संचार होऊ शकतो. मान-सन्मानात वाढ होईल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. कीर्ती वाढेल, प्रवासाला जाऊ शकता. उत्पन्नात वाढ होणार आहे. याशिवाय व्यवसायात फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्या घडण्याची शक्यता आहे. तुम्ही निवडलेल्या करिअरमध्ये यश मिळेल.
कर्क रास
या राशीच्या राशीच्या लोकांसाठी राहूचं गोचर अनुकूल ठरणार आहे. प्रयत्नांचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. तुम्ही या काळात परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती चांगली राहणार आहे.
तूळ रास
मीन राशीतील राहूचे संक्रमणही तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर चांगली बातमी कानावर येऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारात अनपेक्षित नफा होऊ शकतो.
मीन रास
मीन राशीतील राहूचं संक्रमण शुभ परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुटुंबात आनंदाने भरलेला असेल आणि वैवाहिक सुख परिपूर्ण असेल. अडकलेले पैसे मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )