Rahu Budh Yuti: 15 वर्षांनंतर बनणार राहू-बुधाची युती; `या` राशींना होणार प्रचंड लाभ
Rahu Budh Yuti Effects: मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे. राहू आणि बुध जवळपास 15 वर्षांनी एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
Rahu Budh Yuti Effects: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे इतर ग्रहांशी संयोग बनवतात. दोन किंवा इतर ग्रहांच्या संयोगाचा काही राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो.राहु ग्रह सध्या मीन राशीत भ्रमण करत असून 7 मार्च रोजी बुध ग्रह मीन राशीत भ्रमण करणार आहे.
यावेळी मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे. राहू आणि बुध जवळपास 15 वर्षांनी एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळू शकतात.
मीन रास (Meen Zodiac)
बुध आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि राहूचा संयोग शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. व्यावसायिकांसाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होणार आहे. लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. परदेशात मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
राहु आणि बुध यांचे संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय चालवू शकाल. या काळात तुम्हाला व्यवसायात कमी तोटा दिसेल. नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळू शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)